मसुरी: (Musafir Cafe Shooting Location) लेखक दिव्य प्रकाश दुबे यांच्या गाजलेल्या कादंबरीवर आधारित आणि नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली ‘मुसाफिर कॅफे’ ही रोमँटिक ड्रामा सिरीज सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. विक्रांत मेस्सी, वेदिका पिंटो आणि महिमा मखवाना यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या सिरीज मध्ये दाखवलेला 'मुसाफिर कॅफे' आणि त्याचा निसर्गरम्य परिसर प्रेक्षकांना आकर्षित करत आहे. हा कॅफे नेमका कुठे आहे, त्या शूटिंग लोकेशनचे वैशिष्ट्य काय आणि तिथे प्रत्यक्ष जाता येतं का?, याबद्दलची सविस्तर माहिती. (Musafir Cafe Shooting Location)
शूटिंगचे मुख्य ठिकाण: झाडीपानी कॅसल
सिरीज मधील मुख्य केंद्रबिंदू असलेला 'मुसाफिर कॅफे' हा कोणताही कृत्रिम स्टुडिओ सेट नसून उत्तराखंडमधील मसुरी येथील ‘झाडीपानी कॅसल’ या प्रसिद्ध ऐतिहासिक बुटीक हॉटेलचा परिसर आहे. (Musafir Cafe Shooting Location)
कॅफेचा सेट: सिरीजमध्ये दिसणारा लाकडी कॅफे हा शूटिंगसाठी झाडीपानी कॅसलच्या खुल्या जागेत आणि बागेमध्ये उभारलेला तात्पुरता सेट होता. (Musafir Cafe Shooting Location)
कॅसलमधील लाकडी कॉटेजेस, हिरव्या पत्र्याची छते, बोगनव्हिलियाच्या फुलांनी सजलेल्या दगडांच्या भिंती, तिबेटी प्रार्थना ध्वज आणि दरीचे दृश्य सिरीज मध्ये जसेच्या तसे पाहायला मिळते. (Musafir Cafe Shooting Location)
शूटिंगच्या काही आठवड्यांच्या काळात संपूर्ण 'मुसाफिर कॅफे'ची टीम आणि कलाकार (विक्रांत मेस्सी व इतर) झाडीपानी कॅसलमध्येच उतरले होते. कॅसलमधील गार्डन, खुल्या टेरेस, काचेच्या खिडक्या असलेल्या माउंटन-व्ह्यू खोल्या आणि शेकोटीच्या जागेवर सिरीजमधील अनेक महत्त्वाचे प्रसंग चित्रित झाले आहेत. (Musafir Cafe Shooting Location)
खऱ्या 'मुसाफिर कॅफे'ला भेट कशी द्यावी?
झाडीपानी कॅसल हे एक कार्यरत हेरिटेज हॉटेल आहे. कॅफेचा तात्पुरता सेट शूटिंगनंतर काढण्यात आला असला, तरी तिथे येणारे पर्यटक सिरीज मध्ये दाखवलेल्या सर्व जागा, पायऱ्या, बागा आणि व्ह्यू-पॉईंट्सचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकतात. पर्यटकांसाठी येथे लॉग हट्स, स्विमिंग,जकुझी सूट्स आणि टेरेस डायनिंगची सुविधा उपलब्ध आहे. (Musafir Cafe Shooting Location)