मुंबई: (Ek Hota Malin Movie Review ) महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात दुर्दैवी दुर्घटनांपैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील 'माळीण' गावच्या भूस्खलनावर आधारित 'एक होतं माळीण' हा चित्रपट २४ जुलै २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. नैसर्गिक आपत्तीवर आधारित मराठी सिनेसृष्टीतील या पहिल्यावहिल्या मोठ्या प्रयत्नाकडे प्रेक्षक आणि समीक्षकांचे लक्ष लागले होते.
कथानक आणि पार्श्वभूमी
चित्रपटाची कथा २०१४ मध्ये आंबेगाव तालुक्यातील माळीण गावात एका रात्रीत घडलेल्या भीषण दरड दुर्घटनेवर आधारित आहे. मुसळधार पावसात अख्खं गाव मातीखाली गाडलं गेल्याने झालेल्या विनाशाचा आणि त्या दुर्घटनेत उध्वस्त झालेल्या कुटुंबांचा, नातेसंबंधांचा आणि मानवी संघर्षाचा थरार या चित्रपटात मांडण्यात आला आहे. (Ek Hota Malin Movie Review )
समीक्षा आणि तांत्रिक बाजू
चित्रपटात प्रशांत मोहिते, अश्विनी कासार, अभिजित श्वेतचंद्र, सिद्धी पाटणे आणि कै. रामचंद्र धुमाळ यांच्या मुख्य भूमिका आहेत. कलाकारांनी या संवेदनशील विषयाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. राजू राणे आणि दत्तात्रय गायकर यांनी चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. माळीण ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधून वास्तव मांडण्याचा दिग्दर्शकांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. अजय गोगावले आणि आनंद जोशी यांच्या स्वरातील गाणी भावूक करतात. रोहित कुलकर्णी यांचे पार्श्वसंगीत प्रसंगाची गांभीर्यता वाढवते. चित्रपटाची पटकथा काही ठिकाणी संथ होते. नैसर्गिक आपत्तीचा थरार दाखवताना व्हीएफएक्स आणि तांत्रिक काम अधिक मजबूत असायला हवे होते, असा सूर समीक्षकांकडून व्यक्त होत आहे. (Ek Hota Malin Movie Review )