नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत तिन्ही नेते निर्णय घेतील; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

    03-Aug-2026   
Chandrashekhar Bawankule
 
रत्नागिरी : (Chandrashekhar Bawankule) नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते एकत्र बसून निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. त्यांनी सोमवारी, विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला.
 
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "रायगडचे पालकमंत्री कुणाला करायचे हा अधिकारी सर्वस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा आहे. ते एकत्र बसून यावर निर्णय करतील. लवकरच रायगडच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय होईल असे दिसते." नाशिकमध्ये लागलेल्या मंत्री छगन भुजबळ यांच्या पालकमंत्री पदाच्या बॅनरवर बोलताना ते म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांची मागणी करणे योग्य आहे. परंतू, याबाबतचे अधिकार सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचे असून ते योग्य निर्णय करतील. सर्वच पक्षांना सोबत घेऊन, त्यांच्यात समन्वय करून हा निर्णय होत असतो." (Chandrashekhar Bawankule)
 
तलाठी भरतीत महसुल सेवकांना २० टक्के आरक्षण
 
"तलाठ्यांच्या जागा भरताना किमान २० टक्के आरक्षण महसुल सेवकांना द्यावे, अशी मागणी महसुल सेवक कोतवाल यांची आहे. ही मागणी मान्य करण्याचा विचार सरकार करत आहे. यासाठी तलाठ्यांच्या नियुक्तीच्या आरआरमध्ये आणि सेवा, शर्थी, नियमांत काही बदल करावे लागतील. आम्ही हे बदल करू आणि अनुभवी महसुली कोतवालांना तलाठ्यांच्या जागी नियुक्ती देता येईल," असेही त्यांनी सांगितले.(Chandrashekhar Bawankule)
 
ओबीसींच्या मागण्या पूर्ण करू
 
विदर्भात सुरु असलेल्या ओबीसी एल्गारावर बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "ओबीसी आरक्षणाबाबत आतापर्यंत सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्या आहेत. काँग्रेसच्या ६५ वर्षांच्या कार्यकाळात जे निर्णय झाले नाहीत, तेवढे सगळे निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने घेतले आहेत. पण अजूनही काही मागण्या असल्यास आम्ही त्या पूर्ण करू."(Chandrashekhar Bawankule)
 
मंत्री पंकजा मुंडे आणि आ. धनंजय मुंडे यांनी राजकीय निवृत्तीवर भाष्य केले. यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, ‘ पंकजाताई कुठल्या संदर्भाने म्हणाल्या हे माहीत नाही. पण त्या अशा कधीच विचार करत नाही, असे मला वाटते. तसेच धनंजय मुंडे कोणत्या संदर्भाने म्हणाले हे माहीत नाही. त्यामुळे मी टिपण्णी करणे योग्य नाही. खरंतर महाराष्ट्राची संस्कृती, संस्कार जपून राजकारण केले पाहिजे. सर्वांनी एकत्र येऊन विकासाचे राजकारण केले पाहिजे."(Chandrashekhar Bawankule)
 
नाशिकमधील रस्त्यांवरील खड्डेप्रकरणावर मंत्री छगन भुजबळ आणि मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "गिरीश महाजन यांनी ६ महिन्यात पूर्ण कामे होतील असे जबाबदारीने सांगितले आहे. सर्वांचेच कुंभ मेळ्यावर लक्ष आहे. पण कुठल्याही कामाची जबाबदारी एका व्यक्तीची नसून ती सामूहिक असते. त्यामुळे आम्ही सामुहिक जबाबदारीने काम करू."(Chandrashekhar Bawankule)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर