मुंबई: (Jennifer Winget Haldi Ceremony)प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेट हिने नुकताच तिचा पती विलियम इस्माईल आणि जवळच्या मित्रांसोबतच्या हळदी सेरेमनीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. गेल्या महिन्यात वेस्ट वेल्स येथे झालेल्या लग्नानंतर जेनिफरने 'फ्रेंडशिप डे'चे औचित्य साधून तिच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील या खास आठवणी चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. (Jennifer Winget Haldi Ceremony)
हळदीच्या सोहळ्यात देसी अंदाज
व्हाईट वेडिंगनंतर जेनिफर आणि विलियमचा हळदीच्या सोहळ्यात पारंपरिक देसी लुक पाहायला मिळाला. तिने सुंदर हिरव्या रंगाचा लेहंगा परिधान केला होता. विलियम पांढऱ्या रंगाच्या शेरवानीमध्ये अगदी देखणा दिसत होता. हळदीच्या या खास फोटोंमध्ये जेनिफर तिच्या मित्रांसोबत डान्स करताना, हसताना आणि हळद लावून घेताना दिसत आहे. (Jennifer Winget Haldi Ceremony)
मित्र-मैत्रिणींची खास उपस्थिती
या खाजगी आणि कौटुंबिक सोहळ्याला जेनिफरचे टेलिव्हिजन विश्वातील जवळचे मित्र उपस्थित होते. यात अभिनेते करण वाही, हर्लीन सेठी आणि सेहबान अझीम यांचा समावेश होता. हर्लीन सेठीनेदेखील या सोहळ्यातील काही फोटो पोस्ट करत "यारी दोस्ती हळदी" असे कॅप्शन दिले होते. (Jennifer Winget Haldi Ceremony)
"मी जगातील सर्वात नशीबवान..." – जेनिफरची भावूक पोस्ट
फोटोंसोबत जेनिफरने तिच्या मित्रांसाठी एक अत्यंत भावूक संदेश लिहिला आहे. "माझी हळद फक्त एक सोहळा नव्हता... तर ती प्रेमाने भरलेली एक खोली होती. मी जेव्हा जेव्हा हे फोटो पाहाते, तेव्हा मला काहीतरी नवीन दिसतं—कोणाचं तरी हसू, मिठी किंवा आम्हाला प्रोत्साहन देणारे चेहरे. लोक नेहमी म्हणतात की त्यांना चांगले मित्र मिळाले म्हणून ते नशीबवान आहेत, पण मी जगातील सर्वात जास्त नशीबवान व्यक्ती आहे तिने पुढे लिहिले. "तुम्हा सर्वांना माझ्या आयुष्यात मिळवण्यासाठी मी नक्कीच काहीतरी चांगलं केलं असणार. हा दिवस प्लॅन केल्याबद्दल आणि माझ्यावर इतकं मनापासून प्रेम केल्याबद्दल धन्यवाद. हसून हसून माझे गाल दुखेपर्यंत मला हसवल्याबद्दल आणि आयुष्यातील सर्वात मोठी भेट म्हणजे सोबत उभे राहणारे लोक असतात याची आठवण करून दिल्याबद्दल आभार. माझ्या आवडत्या माणसांना हॅपी फ्रेंडशिप डे!" (Jennifer Winget Haldi Ceremony)
युकेमध्ये पार पडले होते लग्न
जेनिफर आणि सिंगापूरस्थित बिझनेसमन विलियम इस्माईल यांनी जुलै महिन्यात युकेमधील वेस्ट वेल्स येथे अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली होती. लग्नाचे फोटो शेअर करत जेनिफरने आपल्या नव्या प्रवासाची घोषणा केली होती. (Jennifer Winget Haldi Ceremony)