मुंबई : (Ashish Shelar News) "ई-स्पोर्ट्स गेम्स फेडरेशन" च्या अध्यक्षपदाची धुरा राज्याचे इलेक्ट्रॉनिक, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विकास मंत्री तथा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी शुक्रवार दि.२८ रोजी स्वीकारली. आपल्या देशातील २२ राज्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थिती झालेल्या फेडरेशनच्या सर्वसाधारण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.(Ashish Shelar News)
ई-स्पोर्ट्स क्षेत्राला अधिक शिस्तबद्ध, पारदर्शक आणि व्यावसायिक स्वरूप मिळावे त्यातून आर्थिक गुंतवणूक मोठ्या प्रमाणात होऊ शकेल व आपल्या देशात रोजगार उपलब्ध होऊ शकेल.(Ashish Shelar News)
युवा पिढीतील डिजिटल कौशल्यांना व्यासपीठ देतानाच ई-स्पोर्ट्सला केवळ मनोरंजन किंवा गेमिंग न मानता कौशल्य, शिस्त, प्रशिक्षण आणि करिअरची संधी असलेले क्षेत्र म्हणून विकसित करण्याचे आव्हान असून आम्ही हे आव्हान स्विकारुन तरुणांसाठी काम करु, मैदानी खेळा प्रमाणे ई स्पोर्ट्स मध्ये ही प्राविण्य असलेले खेळाडू तयार करु, अशी प्रतिक्रिया मंत्री शेलार यांनी याबाबत बोलताना दिली आहे.(Ashish Shelar News)
त्यासाठी विविध राज्यांच्या फेडरेशनशी समन्वय साधून केंद्र सरकारशी आवश्यक तो संवाद साधू असेही नवनियुक्त अध्यक्ष शेलार यांनी म्हटले आहे.(Ashish Shelar News)
दरम्यान, आपल्या देशात ई-स्पोर्ट्स आणि गेमिंग क्षेत्राचा विस्तार प्रचंड वेगाने होत आहे. भारतात सुमारे ५२ कोटी गेमर्स असून दिवसाला ११ कोटी खेळाडू खेळतात आपल्या देशात २८ या खेळांच्या टूर्नामेंट होतात. हे गेम पाहणाऱ्यांची संख्या सुमारे ८ ते ९ कोटी एवढी आहे.(Ashish Shelar News)
पारंपरिक क्रिकेट, फुटबॉल किंवा हॉकीमध्ये जसे राष्ट्रीय संघ, निवड प्रक्रिया, स्पर्धा, प्रशिक्षण, नियम आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्वाची व्यवस्था असते, त्याच धर्तीवर ई-स्पोर्ट्समध्येही एक संरचित व्यवस्था उभारण्याचे काम हे फेडरेशन करते.(Ashish Shelar News)
दरम्यान, क्रिकेट, फुटबॉल, दोरीउड्या, दहिहंडी साहसी खेळ अशा विविध मैदानी खेळांच्या फेडरेशन व संघटनांवर काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या एँड. आशिष शेलार यांच्या नियुक्तीमुळे या क्षेत्राला नवी चालना मिळेल, असा आशावाद फेडरेशने व्यक्त केला आहे.(Ashish Shelar News)