संगमनेरमध्ये राज्यस्तरीय योगासन स्पर्धेचा उत्साह; आमदार सत्यजीत तांबे यांची उपस्थिती

    28-Aug-2026
Sangamner Yoga Asana Competition

मुंबई, (अभिनंदन परुळेकर): Sangamner Yoga Asana Competition"भारताने जगाला दिलेल्या योगाला क्रीडा प्रकार म्हणून मान्यता मिळावी आणि योगासन क्षेत्रातील खेळाडूंना महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार मिळावा, यासाठी विधिमंडळासह विविध व्यासपीठांवर सातत्याने भूमिका मांडली. आपल्या सर्वांच्या पाठिंब्यामुळे या प्रयत्नांना यश मिळाले असून, आता योगासनात कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या खेळाडूंना शासकीय नोकरीत ५ टक्के आरक्षण मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार ." असे आमदार सत्यजीत तांबे यांनी सांगितले.Sangamner Yoga Asana Competition
 
संगमनेर येथील ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये आयोजित सातव्या राज्यस्तरीय योगासन क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी आमदार तांबे बोलत होते. यावेळी त्यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या अनेक योगसाधक खेळाडूंशी संवाद साधला.Sangamner Yoga Asana Competition
 
योगासन क्षेत्रातील खेळाडूंना व्यासपीठ आणि संधी मिळवून देण्यासाठी मालपाणी उद्योग समूहाचे संचालक डॉ. संजय मालपाणी यांचे योगदान कौतुकास्पद असल्याचे तांबे यांनी नमूद केले. योगासनाच्या माध्यमातून राज्यातील अनेक खेळाडू उत्तम कामगिरी करत असून, त्यांच्या गुणवत्तेला योग्य संधी मिळणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.Sangamner Yoga Asana Competition
 
योगासनाला क्रीडा प्रकाराची मान्यता आणि खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार मिळावा यासाठी यापूर्वी सातत्याने पाठपुरावा केला. आता योगासनात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना शासकीय नोकरीत ५ टक्के आरक्षणाचा लाभ मिळावा, ही पुढची मागणी असून, ती मान्य होईपर्यंत शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करत राहणार असल्याचे आमदार तांबे यांनी स्पष्ट केले.Sangamner Yoga Asana Competition
 
यावेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासह योगासन क्षेत्रातील पदाधिकारी, प्रशिक्षक, खेळाडू आणि मान्यवर उपस्थित होते.Sangamner Yoga Asana Competition
 
 




संबंधित मजकूर