संकल्प संस्थेच्या पॅरा कौन्सिलिंग कोर्सची पहिली बॅच यशस्वी; प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण

    28-Aug-2026   
 
Sankalp Para-Counseling Course
 
मुंबई (Sankalp Para-Counseling Course) : संकल्प संस्था आयोजित पॅरा कौन्सिलिंग कोर्सच्या प्रथम बॅचचा प्रमाणपत्र वितरण, निरोप व समारोप सोहळा नुकताच रोजी न्यू इंग्लिश स्कूल , नेहरू नगर, कुर्ला (पूर्व) येथे संपन्न झाला. संकल्प संस्थेच्या या प्रशिक्षणात समुपदेशनाची मूलभूत तत्त्वे, मानसिक आरोग्य, प्रभावी संवाद, व्यसनमुक्ती, आत्महत्या प्रतिबंध, ट्रॉमा कौन्सिलिंग, करिअर मार्गदर्शन, जीवन कौशल्ये, कायदेविषयक माहिती, सरकारी योजना, नेतृत्व व टीमवर्क, डिजिटल कौन्सिलिंग आदी २८ महत्त्वपूर्ण विषयांवर १८ तज्ज्ञांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. विविध प्रात्यक्षिके, संवादात्मक सत्रे आणि शैक्षणिक क्षेत्रभेटींच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष अनुभव देण्यावर विशेष भर देण्यात आला. समारोप सोहळ्यास प्रमुख अतिथी डॉ. भाग्येश लाड तसेच अभिनेता राजदेव जमदाडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संकल्प संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष विनोद हिवाळे होते. (Sankalp Para-Counseling Course)
 
मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून समुपदेशन क्षेत्रात संवेदनशीलता, संयम, सहानुभूती, प्रभावी संवाद आणि सामाजिक बांधिलकी यांचे महत्त्व अधोरेखित केले. प्रशिक्षणातून मिळालेले ज्ञान केवळ प्रमाणपत्रापुरते मर्यादित न ठेवता समाजातील गरजू, अडचणीत असलेल्या व्यक्ती व कुटुंबांना योग्य मार्गदर्शन आणि मानसिक आधार देण्यासाठी त्याचा उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी प्रशिक्षणार्थींना केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशोधरा साळवे व संतोष कुलकर्णी यांनी केले. यावेळी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. (Sankalp Para-Counseling Course)
 
 




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर