मुंबई (Rishikesh Shete Attack in Nevasa) : ईदच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवार, दि. २७ ऑगस्ट रोजी हिंदूंविरोधात धर्मांध मुस्लिम जमावाकडून मॉबलिंचिंग झाल्याची घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा शहरात घडली. भाजप जिल्हा उपाध्यक्ष (अहिल्यानगर उत्तर भाग) ऋषिकेश शेटे यांनी अतिक्रमणविरोधात तक्रार केल्याच्या रागातून जमावाने भर रस्त्यात त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. ६० ते ८० जणांच्या हिंसक जमावाने त्यांच्या गाडीवर तुफान दगडफेक केल्याचे निदर्शनास आले. सदर प्रकरणी नेवासा पोलिसांनी २३ ज्ञात आणि अन्य ६० ते ८० अज्ञातांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मिळालेल्या एफआयआर कॉपीनुसार, नेवासा शहरातील गणपती चौक ते ज्ञानेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर अवैधरित्या उभ्या राहणाऱ्या फळ विक्रेत्यांच्या हातगाड्यांमुळे सातत्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. याबाबत ऋषिकेश शेटे यांनी नगर पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सागर झावरे यांना अतिक्रमण हटवण्यासाठी लेखी निवेदन दिले होते. दि. २७ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे ३:१५ वाजता प्रशासनाकडून अतिक्रमणावर कारवाई सुरु होणार असतानाच ऋषिकेश शेटे हे आपल्या मित्राच्या स्कोडा गाडीतून आपल्या अंगरक्षकासह गणपती चौकातून जात होते. त्यावेळी प्रशासकीय कारवाईमुळे संतप्त झालेल्या फळ विक्रेते आणि स्थानिक लोकांच्या जमावाने त्यांची गाडी अडवली. (Rishikesh Shete Attack in Nevasa)
Exclusive : Mob lynching effort right in front of Police
Muslims attempted to mob-lynch Rishikesh and Krishna who had raised concerns over unauthorized encroachments around the Dnyaneshwar Maharaj Temple in Nevasa, Ahilyanagar.
आसिफ पठाण व अब्बास बागवान यांनी जमावाला चिथावणी दिल्यानंतर सुमारे ६० ते ८० जणांच्या हिंसक जमावाने शेटे यांच्या कारला चारी बाजूंनी वेढा घातला. जमावाने गाडीवर हाताने मारत दरवाजे ओढण्याचा प्रयत्न केला. शेटे यांनी आतून दरवाजा घट्ट धरून ठेवल्याने जमावातील उपद्रवियांनी रस्त्यावरील दगड उचलून कारच्या पुढील व मागील काचा फोडून टाकल्या. काही जण गाडीच्या बोनेटवरही चढले. याच दरम्यान, अरबाज बागवान याने कारची फुटलेली काच आणि खिडकीतून आत हात घालून फळ कापण्याच्या चाकूने ऋषिकेश शेटे यांचा गळा कापून त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. शेटे यांनी प्रसंगावधान राखून त्याचा हात पकडल्याने चाकू त्यांच्या उजव्या हाताला लागून ते जखमी झाले. (Rishikesh Shete Attack in Nevasa)
शेटे यांच्या पाठीमागील सीटवर बसलेले पोलीस अंगरक्षक अमोल पवार यांनी तात्काळ आपल्या ताब्यातील कारबाईन बंदुकीचा बट हल्लेखोर अरबाजच्या हातावर मारला, ज्यामुळे त्याच्या हातातील चाकू पडला आणि शेटे बचावले. तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत हिंसक जमावाला पांगवले आणि गाडीला त्या भागातून सुरक्षित बाहेर काढले. या जीवघेण्या हल्ल्यानंतर ऋषिकेश शेटे यांनी पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर फिर्याद नोंदवली.
या प्रकरणी आसिफ पठाण, अब्बास बागवान, परवेज बागवान, अरबाज बागवान, सलमान उर्फ साहिल बागवान, शोएब राजू बागवान, शाहरुख बागवान, फारुक बागवान, जुम्मा जहागीरदार, फरहान बागवान, रिहान बागवान, शाहरुख भाईसाब, मोसिम हणू बागवान, दाऊद बागवान, मोहसीन बागवान, अज्जु बागवान, मोसिम अब्बाज बागवान, मोहम्मद बागवान, नवाब बागवान, शहीद बागवान, निसार बागवान, अरबाज बागवान आणि इतर इतर ६० ते ८० अज्ञात इसमांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये कलम १०९(१), ११५(२), १८९(२), १९०, १९१(२), ३५१(२), ३५२, ३२४(४) अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस सध्या या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. (Rishikesh Shete Attack in Nevasa)
संपूर्ण अहिल्यानगरात तीव्र संतापाची लाट
अहिल्यानगरमध्ये काही दिवसांपूर्वीच घडलेल्या धीरज परदेशी हल्ला प्रकरणाची शाई अद्याप वाळलेली नसतानाच ऋषिकेश शेटे यांच्यावर भरदिवसा झालेला हा प्राणघातक हल्ला मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरला आहे. कपाळाला भगवे गंध लावले म्हणून धीरज परदेशी यांची हत्या आणि आता अवैध अतिक्रमण हटवण्याचा मुद्दा उचलला म्हणून ऋषिकेश शेटे यांच्यावर प्राणघातक हल्ला या दोन्ही घटनांमुळे संपूर्ण अहिल्यानगरात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. प्रशासकीय कारवाईविरोधात कायदा हातात घेणाऱ्या उपद्रवी जमावावर कठोर कारवाई करण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आली आहे. (Rishikesh Shete Attack in Nevasa)
नगर पंचायतीच्या अधिकाऱ्यांवरही धर्मांधांचा हल्ला!
अहिल्यानगरमध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना पूर्वीप्रमाणे आजही लक्ष्य केले जात आहे. नगर पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सागर झावरे यांच्यासह एकूण ८ पोलिसांवर सुद्धा यावेळी हिंसक जमावाकडून हल्ला करण्यात आला. परंतु पोलिसांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला नाही. धर्मांध मुस्लिम लोकं सागर झावरे यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. संपूर्ण शासकीय यंत्रणेवर झालेला हा हल्ला असून हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल व्हायलाच हवा, तसे न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल! - ऋषिकेश शेटे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष (अहिल्यानगर उत्तर भाग) (Rishikesh Shete Attack in Nevasa)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक