मुंबई (nSEPIA AI Emotion Detection App) : तुम्ही काही न बोलताही तुमचा चेहरा, डोळ्यांची हालचाल आणि शरीराची देहबोली तुमची भावनिक अवस्था सांगू शकते का? आता याच तंत्रज्ञानाच्या मदतीने तुमच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करणारे नवे AI ॲप बाजारात दाखल झाले आहे. Nihilent Limited ने ‘nSEPIA’ हे AI-पॉवर्ड इमोशन डिटेक्शन आणि इमोशनल वेलनेस ॲप जागतिक स्तरावर लॉन्च केले आहे.
‘Emotions. In Balance.’ या संकल्पनेवर आधारित nSEPIA वापरकर्त्याची सध्याची भावनिक अवस्था समजून घेते आणि त्यानुसार पुढील योग्य कृती सुचवते. हे ॲप Android आणि iOS या दोन्ही प्लॅटफॉर्मवर आंतरराष्ट्रीय स्तरावर डाउनलोडसाठी उपलब्ध आहे. (nSEPIA AI Emotion Detection App)
It's here. Watch the nSEPIA film to know more about the World’s First AI Emotion Detection App.
या जगात प्रत्येक व्यक्तीला भावना असतात आणि आपल्या विचारांवर तसेच निर्णयांवर या भावनांचा मोठा प्रभाव पडतो. मात्र, अनेकदा भावनांच्या भरात आपल्याकडून नकळत काही चुका होतात. अशा चुकांचा परिणाम आपल्या वैयक्तिक आयुष्यावर, नातेसंबंधांवर आणि दैनंदिन निर्णयांवर होऊ शकतो. (nSEPIA AI Emotion Detection App)
म्हणूनच आपल्या भावनांना समजून घेणे आणि त्यांच्यावर योग्य नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे ठरते. भावनांची जाणीव करून देण्यास आणि त्यांचे व्यवस्थापन करण्यास हे ॲप उपयुक्त ठरू शकते.
चेहऱ्याच्या हालचालींवरून भावनिक अवस्था जाणून घेणार
nSEPIA चा वापर करण्यासाठी स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून एक छोटासा संवाद केला जातो. AI तंत्रज्ञानाच्या मदतीने चेहरा आणि डोळ्यांच्या परिसरातील सूक्ष्म हालचाली, तसेच डोके आणि शरीराच्या वरच्या भागातील हालचालींचे विश्लेषण केले जाते. या माहितीच्या आधारे वापरकर्त्याची भावनिक अवस्था समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. (nSEPIA AI Emotion Detection App)
विशेष म्हणजे, हे विश्लेषण डिव्हाइसवरच प्रक्रिया केले जाते, त्यामुळे वापरकर्त्याच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यावर भर देण्यात आला आहे.
ॲपचा वापर कसा करावा?
nSEPIA ॲप Google Play Store आणि Apple App Store या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. ॲप डाउनलोड करण्यासाठी https://surli.cc/qoohtk दिलेल्या लिंकचा वापर करता येईल. (nSEPIA AI Emotion Detection App)
ॲप डाउनलोड केल्यानंतर आवश्यक त्या अटी व शर्ती स्वीकाराव्या लागतील. त्यानंतर ॲपच्या माध्यमातून कॅमेऱ्याचा वापर करून तुमचा चेहरा स्कॅन केला जाईल. चेहऱ्याचे स्कॅनिंग पूर्ण झाल्यानंतर ॲप तुमच्या भावनिक स्थितीशी संबंधित माहिती दाखवेल.
यामध्ये विविध भावनांचे टक्केवारीनुसार विश्लेषण तसेच वेगवेगळ्या रंगांच्या माध्यमातून भावनांचे सादरीकरण केले जाते. त्यामुळे आपल्या सध्याच्या भावनिक स्थितीचा अहवाल सहज समजून घेता येतो. (nSEPIA AI Emotion Detection App)
फक्त भावना ओळखून थांबण्याऐवजी nSEPIA त्यानुसार वैयक्तिक उपाय सुचवते. यामध्ये संगीत, श्वसनाचे व्यायाम, योग आणि ध्यान यांचा समावेश आहे.
भारतीय शास्त्रीय राग, पाश्चिमात्य सिंफॉनिक संगीत तसेच विशेषरित्या तयार केलेल्या संगीत रचनांचा पर्यायही ॲपमध्ये उपलब्ध आहे. ध्यान, श्वसन आणि योगाच्या अनुभवांमध्ये भारतीय परंपरांवर आधारित पद्धतींचा वापर करण्यात आला असून, त्यात B.K.S. अय्यंगार परंपरेचा प्रभावही आहे.
‘Emoscape™’ आहे nSEPIA च्या मागचे तंत्रज्ञान
nSEPIA च्या मागे Nihilent चे ‘Emoscape™’ हे Emotion AI प्लॅटफॉर्म कार्यरत आहे. Artificial Intelligence, Computer Vision आणि Machine Learning यांचा वापर करणारे हे तंत्रज्ञान ‘नाट्यशास्त्रा’तील नवरसांच्या संकल्पनेवर आधारित असल्याचे कंपनीने म्हटले आहे. (nSEPIA AI Emotion Detection App)
Emoscape™ हे वैद्यकीय दर्जाचे Emotion AI प्लॅटफॉर्म असून, त्याच्या क्षमतेचे वैज्ञानिक आणि शैक्षणिक संशोधनाद्वारे मूल्यमापन करण्यात आले आहे. व्यावसायिक आणि संस्थात्मक वापरासाठी विकसित करण्यात आलेल्या या तंत्रज्ञानाला nSEPIA च्या माध्यमातून आता दैनंदिन वापरासाठी व्यक्तींपर्यंत पोहोचवण्यात आले आहे. (nSEPIA AI Emotion Detection App)
भावना ओळखा, उपाय करा आणि बदल अनुभवा
nSEPIA ची प्रक्रिया तीन टप्प्यांत मांडण्यात आली आहे—भावना समजून घेणे, त्यानुसार कृती करणे आणि त्यानंतर झालेला बदल तपासणे. एखाद्या हस्तक्षेपानंतर वापरकर्ता पुन्हा आपल्या भावनिक अवस्थेचे मूल्यांकन करू शकतो. त्यामुळे आपल्या भावनांमध्ये झालेला बदल जाणून घेण्याची संधी मिळते. (nSEPIA AI Emotion Detection App)
Nihilent चे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष एल.सी. सिंग यांच्या मते, तंत्रज्ञानाचा उद्देश मानवी समजुतीची जागा घेणे नसून, व्यक्तीला स्वतःबद्दल अधिक जागरूक होण्यास मदत करणे हा आहे. याच उद्देशाला कंपनीच्या ‘Humanising Technology’ या व्यापक संकल्पनेशी जोडण्यात आले आहे. (nSEPIA AI Emotion Detection App)
मानसोपचारतज्ज्ञ आणि मानसोपचारशास्त्राचे प्राध्यापक एमेरिटस डॉ. विहंग वहिया यांनीही भावनांना मानवी वर्तन आणि कल्याणाचा अविभाज्य भाग असल्याचे नमूद करत, भावनिक अवस्था अधिक वस्तुनिष्ठ पद्धतीने समजून घेण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले आहे.
AI, चेहऱ्यावरील हालचाली आणि भारतीय नवरसांची संकल्पना यांचा संगम साधणारे nSEPIA भावनिक आरोग्याच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाचा नवा प्रयोग ठरणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.
AIचा योग्य वापर, आधुनिक तंत्रज्ञान आणि मानवी जीवनातील अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या भावनांचा विचार करून nSEPIA ॲपविकसित करण्यात आले आहे. हे ॲप कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) माध्यमातून व्यक्तीची भावनिक स्थिती ओळखण्यास मदत करते. जगातील पहिले AI-आधारित भावना ओळखणारे ॲप असल्याचा दावा nSEPIAकडून करण्यात आला आहे. (nSEPIA AI Emotion Detection App)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.