विजय वडेट्टीवार यांच्या दाव्याने राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि काँग्रेसमधील संघर्ष वाढणार ?

    27-Aug-2026
 
Vijay Wadettiwar Supriya Sule OBC Certificate Controversy
 
मुंबई (Vijay Wadettiwar Supriya Sule OBC Certificate Controversy) : कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी खासदार सुप्रिया सुळेंबाबत ओबीसी प्रमाणपत्रविषयी केलेल्या नवीन दाव्याने राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि कॉंग्रेसमधील संघर्ष वाढणार का ?अशी चिन्हे दिसू लागली आहेत. यापूर्वी देखील काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये अशाप्रकारे आरोप प्रत्यारोप सुरू होते. त्यात आता वडेट्टीवार यांच्या नवीन दाव्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी मधील दुफळी वाढण्याची चिन्हे आहेत.
 
"खासदार सुप्रिया सुंळेसह राज्यातील अनेक मराठा समाजाच्या मोठ्या नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे.मनोज जरांगे पाटील यांना कदाचित हे माहिती नसेल. एकतर ओबीसींच आरक्षणही वाढत नाही आणि ओबीसींमध्ये घुसखोरी देखील वाढली आहे.त्यामुळे उद्या ओबीसींच वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही हे तेवढच सत्य आहे.”असा दावा कॉंग्रंसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.एवढेच नाही तर,“मला वाटत आता ओबीसींनी जनरल व्हावे आणि सगळ्यांनी ओबीसीत यावे.”असा टोला देखील वडेट्टीवार यांनी लगावला आहे.यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून वडेट्टीवार यांनी थेट सुप्रिया सुळेंचे नाव घेतल्याने विशेषता कॉंग्रेस आणि शरद पवारांच्या ऱाष्ट्रवादीत पुन्हा एकदा संर्घष उफाळण्याची चिन्हे आहेत. (Vijay Wadettiwar Supriya Sule OBC Certificate Controversy)
 
 
 
“माझ्याकडे ओबासी प्रमाणपत्र नाही आहे आणि याबाबत ते मला विचारू शकतात.राज्यातील कॉंग्रेसचे नेते अशा खोट्या गोष्टी पसरवत असतील तर हे अयोग्य आहे.मला दिल्ली कॉंग्रेसपर्यंत या गोष्टी न्याव्या लागतील.कॉंग्रेसने माझे प्रमाणपत्र दाखवावे.राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला राज्यातील कॉंग्रेस का टार्गेट करत कळत नाही आहे.मी यासंदर्भात अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींना फोन केला आहे.”अशी तीव्र प्रतिक्रीया खासदार सुप्रिया सुळेंनी माध्यमांशी बोलताना गुरूवार दि.२७ रोजी दिली आहे.
 
“२०१४ रोजीच्या अशाच वागण्याने कॉंग्रेसने सरकार घालवल होत.महाविकास आघाडीच्या एकत्रीतपणात कुणी खडे टाकू नयेत.आम्ही संयम पाळून आहोत.आमच्या नेत्यांवर जर असा सातत्याने बोलण्याचा प्रयत्न झाला तर नाईलाजाने आम्हालादेखील काही उत्तर द्यावी लागतील.प्रसिध्दी मिळवण्यासाठी विजय वडेट्टीवार जर सातत्यान असे बोलत असतील तर ते योग्य नाही.”असे वक्तव्य यावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशीकांत शिंदे यांनी केले आहे. (Vijay Wadettiwar Supriya Sule OBC Certificate Controversy)
 
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदारांनी मध्यंतरी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. त्यावेळी देखील सुप्रिया सुळे आणि राज्यातील कॉंग्रेंसमध्ये कलगीतुरा पहायला मिळाला होता. ‘काय शिजतय हे पहाव लागेल.’ असा टोला त्यावेळी विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षास लगावला होता. तर ‘सत्ताधा-यांकडून काम होत असतात आणि उघड नसल्या तरी गुप्त बैठका सातत्याने होत असतात.’असे वक्तव्य कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले होते.
 
“नियमात बसत असेल तर असे प्रमाणपत्र असणे त्यात वावग काय आहे.कायद्यान मिळत असेल तर घ्यायला काय अडचण आहे.”अशी प्रतिक्रीया उबाठाचे आमदार अंबादास दानवेंनी दिली आहे. (Vijay Wadettiwar Supriya Sule OBC Certificate Controversy)
 
 




संबंधित मजकूर