मुंबई : (Pro Govinda League) "एकीच्या मार्गाने आपण मोठी कामं करू शकतो.गोविंदा हा खेळ चॅम्पियन्सचा आहे.या खेळात संघभावना महत्वाची आहे.तसेच महाराष्ट्राच्या गोविंदा खेळाला अखिल भारतीय स्तरावर नेण्यासाठी एशीयाड,क़ॉमनवेल्थ आणि ऑलिम्पिकपर्यंत घेऊन जाण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.”अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार दि.२५ रोजी दिली.(Pro Govinda League)
गोविंदांच्या पारंपरिक खेळाला आधुनिक आणि व्यावसायिक व्यासपीठ देणाऱ्या प्रो गोविंदा लीग सीझन ४ च्या शुभारंभ प्रसंगी एस.व्ही.पी.डोम,एन.एस.सी.आय.,वरळी,मुंबई येथे ते बोलत होते. या सोहळ्यास परिवहन मंत्री तथा प्रो गोविंदा लीगचे संस्थापक प्रताप सरनाईक,मुंबईच्या महापौर रितू तावडे, युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक, माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, तसेच शायना एन. सी. यांची प्रमुख उपस्थिती लाभली. २५ ते २७ ऑगस्ट दरम्यान रंगणा-या या चौथ्या सीझनमध्ये एकूण १६ संघासह ३ हजारपेक्षा जास्त खेळाडू सहभागी असून भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव ब्रँड अँबेसिडर आहे.(Pro Govinda League)
“खरोखर अतीशय़ अभिमानाची गोष्ट आहे की आपली संस्कृती आणि मुंबईची ओळख असलेला गोविंदा हा प्रो गोविंदाच्या रूपाने संपूर्ण भारतात पोहोचला आहे.गोकुळाष्टमीच्या निमीत्ताने केली जाणारी दहीहंडी ही संपूर्ण समाजाला एकत्रीत करून सामाजिक अभीसरणाची हंडी असते. यामागचा भगवान श्रीकृष्णाचा संदेश हा आहे की संपूर्ण समाज एक आहे.”असेही प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.(Pro Govinda League)
“महाराष्ट्राचा हा उत्सव संपूर्ण जगापर्यंत पोहोचण्यासाठी आमचा प्रयत्न आहे.राज्यशासनामार्फत गोविंदांचा विमा काढला जावा असा प्रस्ताव २०२३ साली सर्वप्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आणि त्याचा आम्हाला लाभ झाला.”असे युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक म्हणाले.(Pro Govinda League)
परीवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, “गोविंदांच्या या खेळाचा साहसी क्रीडाप्रकारात समावेशसुध्दा मुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस यांच्याच काळात झाला.राज्यातील हा खेळ जागतिक स्तरावर जावा अशी आमची इच्छा आहे.या सोहळ्याचे आयोजन अतिशय चांगल्या पध्दतीने केले जाते.”(Pro Govinda League)