पनवेलमध्ये ‘जिम जिहाद’चा प्रकार हिंदुत्ववाद्यांनी उधळून लावला; दोन धर्मअंध मुस्लिम ट्रेनर्सनची हकालपट्टी

छत्रपती शिवराय आणि बजरंगबलीची गाणी बंद करून खिल्जीचे गाणे लावल्याचा सातत्याने प्रकार..

    27-Aug-2026
Panvel Gym Controversy
 
ठाणे : (Panvel Gym Controversy) छत्रपती शिवाजी महाराज आणि बजरंगबलीची प्रेरणादायी गाणी जिममध्ये लावण्यावरून पनवेल शहरातील जॅग्वार जिममध्ये मोठा वाद निर्माण झाला. बजरंगबलीचे गाणे सुरू असताना जिम मधील मुसलमान धर्मांध ट्रेनर ने ते बंद करून त्यानंतर अल्लाउद्दीन खिल्जीशी आणि अकबराशी संबंधित गाणे मोठ्या आवाजात लावल्याने जिम मधील सदस्यांनी त्याला आक्षेप घेतला.. हिंदू असणार्या जिम मालकाने याची कितीही दखल न घेतल्याने जिम मधल्या सदस्यांनी केलक्या तक्रारीनुसार हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी जिम वर धडक देत या प्रकाराला ‘जिम जिहाद’ म्हणत कार्यकर्त्यांनी जिम व्यवस्थापनाला जाब विचारला.(Panvel Gym Controversy)
 
पनवेल मध्ये राहणारे जयदीप पाटील हे जॅग्वार जिमचे सदस्य असून, जिममध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची तसेच बजरंगबलीची गाणी लावण्यात यावीत, अशी मागणी त्यांनी यापूर्वी जिम मालकाकडे केली होती. मात्र, अशी गाणी जिममध्ये लावली जात नसल्याचे त्यांना सातत्याने आढळून आले.(Panvel Gym Controversy)
 
रविवारी जिममध्ये व्यायाम सुरू असताना बजरंगबलीचे गाणे सुरू करण्यात आले होते. त्यावेळी तेथे असलेल्या दोन मुस्लिम ट्रेनर्सनी हे गाणे बंद करून . त्यानंतर सलग दोन हिंदी गाणी लावण्यात आली आणि पुढे अल्लाउद्दीन खिल्जीशी संबंधित गाणे मोठ्या आवाजात वाजविण्यात आल्याचे जयदीप पाटील यांनी सांगितले.(Panvel Gym Controversy)
 
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या जयदीप पाटील यांनी “महाराजांचे आणि बजरंगबलीचे गाणे बंद करून खिल्जीचे गाणे का लावले?” असा सवाल करत जिम व्यवस्थापनाला जाब विचारला. त्यावरून जयदीप आणि जिम मालकामध्ये वाद झाला. जिम मालकाने जो स्वतः एक हिंदू आहे त्यानेही त्या दोन मुसलमान ट्रेनर्स पुढे गुडघे टेकत वाद नको म्हणून जयदीप यांना सदस्यत्वाची रक्कम परत देत जिम सोडण्यास सांगितले. यानंतर जयदीप पाटील यांनी भाजपचे पनवेल शहराध्यक्ष तथा नगरसेवक सुमित झुंजारराव यांच्याकडे या प्रकरणाची तक्रार केली.(Panvel Gym Controversy)
 
हा प्रकार पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला. आमदारांनी जिममध्ये जाऊन व्यवस्थापनाला जाब विचारण्याच्या सूचना दिल्याचे सांगण्यात आले.त्यानुसार भाजपचे शहराध्यक्ष तथा नगर सेवक सुमित झुंजारराव, युवा मोर्चाचे पदाधिकारी, भाजप कार्यकर्ते आणि हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी जॅग्वार जिममध्ये दाखल झाले आणि त्यांनी जिम मालकाला धारेवर धरत सदर प्रकारचा जाब विचारला.. त्यानंतर मात्र जिम मालकाने आपणहि हिंदू असून गैरसमजामुळे हा प्रकार घडल्याचे स्पष्टीकरण दिले.(Panvel Gym Controversy)
 
तीन मागण्यांवर व्यवस्थापन नरमले
 
या वेळी झुंजारराव यांनी जिम मालकासमोर तीन प्रमुख मागण्या ठेवल्या. संबंधित दोन्ही मुसलमान धर्मांध ट्रेनर्सवर तात्काळ कारवाई करून त्यांना जिममधून हटवावे, जयदीप पाटील यांना सन्मानपूर्वक पुन्हा जिमचे सदस्यत्व द्यावे आणि भविष्यात मागणीनुसार जिममध्ये छत्रपती शिवाजी महाराज तसेच बजरंगबलीची प्रेरणादायी गाणी लावण्यास कोणताही अडथळा निर्माण करू नये, अशी मागणी करण्यात आली.(Panvel Gym Controversy)
 
जिम मालकाने या तिन्ही मागण्या मान्य करून तत्काळ जिहादी मनोवृत्तीच्या ट्रेनरसची हकालपट्टी केली.. संबंधित दोन्ही धर्मांध जिहादी मनोवृतीच्या मुसलमान ट्रेनर्सनी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागत आपल्याकडून चूक झाल्याचे मान्य केले. मात्र, हे दोन्ही ट्रेनर्स पुन्हा जिममध्ये दिसता कामा नयेत, अशी ठाम भूमिका झुंजारराव आणि सर्वच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी घेतली.(Panvel Gym Controversy)
 
असले प्रकार खपवून घेणार नाही
 
“महाराजांच्या आणि बजरंगबलीच्या गाण्यांना या महाराष्ट्रात आक्षेप घेणार्याच्या मनात नक्कीच कहीतरी वेगळे विचार असणार..वेगळी प्रथा पडायचा आमचा अजिबात प्रयत्न नाही पण महाराज आणि बजरंग बलीची मोटीवेशनल गाणी लावण्याची मागणी होत असताना ती नाकारणे हा प्रकार बहुसंख्य हिंदू असणाऱ्या आपल्या देशात नक्कीच निंदनीय आहे असले प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत हे ध्यानात ठेवा.”(Panvel Gym Controversy)
 
 




संबंधित मजकूर