मुंबई : (Amravati Dahi Handi Cancelled) अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू, तर सहा बालके जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेने अमरावतीसह संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर अमरावती भाजपच्यावतीने आयोजित करण्यात आलेली दहीहंडी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुर्दैवी घटनेमुळे वातावरण दुःखद असताना जल्लोष करणे उचित ठरणार नाही, अशी भूमिका अमरावती भाजपने घेतली आहे. दहीहंडी कार्यक्रमावर होणारा खर्च पीडित कुटुंबीयांना मदतीसाठी देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावती भाजपच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. (Amravati Dahi Handi Cancelled)
‘दहीहंडी कार्यक्रमाऐवजी पीडित कुटुंबीयांना मदत करण्याचा निर्णय संवेदनशील आहे. या दुर्दैवी घटनेतील सर्व पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आम्ही सर्वजण आहोत, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे. नवजात बालकांच्या मृत्यूची घटना हृदय पिळवटून टाकणारी असून, या घटनेने आपण सर्वच जण दुःखी आणि अस्वस्थ असल्याची भावना बावनकुळे यांनी व्यक्त केली. दुःखाच्या या प्रसंगी पीडित कुटुंबीयांना आधार देणे आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणे हीच आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. (Amravati Dahi Handi Cancelled)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.