मुंबई (Parel Chinchpokli Eid Clash) : परळ-चिंचपोकळी परिसरात बुधवारी रात्री ईदनिमित्त निघालेल्या मिरवणूकीदरम्यान दोन गटांत तुफान राडा झाला. परळच्या लक्ष्मी कॉटेज परिसरात ईद साजरी करून परतणाऱ्या काही धर्मांध मुस्लिमांनी हिंदुबहुल भागात घोषणाबाजी केल्याने परिसरातील वातावरण चिघळल्याचे समोर आले आहे. रात्रीच्या वेळी गोंधळ घालणाऱ्या हुल्लडबाजांना जेव्हा स्थानिक हिंदूंनी शांततेत जाण्याचे आवाहन केले, तेव्हा झालेल्या बाचाबाचीनंतर वाद मोठ्या प्रमाणात वाढत गेला. पोलिसांनी केलेल्या मध्यस्थीनंतर परिस्थिती सध्या नियंत्रणात असून परळ-चिंचपोकळी परिसरात सध्या शांतता आहे. (Parel Chinchpokli Eid Clash)
CLASHES DURING EID MILAD PROCESSION IN MUMBAI
Tension broke out in Mumbai’s Parel-Chinchpokli area last night during an Eid Milad-un-Nabi procession near Laxmi Cottage. A scuffle between two groups escalated into stone pelting, with some people injured and taken to KEM… pic.twitter.com/alPc6Qfkhf
स्थानिक रहिवाशांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री १२ च्या नंतर ईद साजरी करून परतत असताना काही हुल्लडबाज पोरं एका दुचाकीवर तीन-तीन जणं बसून 'नारा-ए-तकबीर'च्या घोषणा देत जात होते. तसेच काही हिंदू मुले दिसली की आणखी जोरजोरात ते ओरडत होते. म्हणजेच विनाकारण परिस्थिती चिघळवण्याचा ते प्रयत्न करत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात आला आहे. यातलेच काहीजण फूटपाथवरून गाड्या घेऊन जात असल्याने उपस्थित हिंदू मुलांनी त्यांना रस्त्यावरून जाण्याची विनंती केली असता, दुचाकीस्वारांनी त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केल्याचे स्थानिकांनी सांगितले. या किरकोळ वादातून पुढे मोठा तणाव निर्माण झाला, असे सांगण्यात येते आहे.
Mumbai, Maharashtra: Tension prevailed in Mumbai’s Parel-Chinchpokli area following a clash and stone-pelting incident near Laxmi Cottage building during an Eid procession. According to initial information, a scuffle and heated exchange took place between two groups during the… pic.twitter.com/eq23eDMhoi
घटनेची माहिती मिळताच पोलीस मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. हे हुल्लडबाज धर्मांध मुस्लिम मुले पोलिसांना सुद्धा जुमानत नसल्याचे, सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या काही व्हिडिओतून निदर्शनास आले. हिंदूंसमोर करत असलेल्या घोषणाबाजीला प्रत्युत्तर म्हणून परिसरातील हिंदू मुलांनी 'जय श्रीराम'च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. पोलिसांनी परिस्थिती हाताळत जमावाला शांत केले आणि सर्वांना घरी परतण्यास सांगितले. तणावाची परिस्थिती लक्षात घेता सध्या मुंबई पोलिसांसह राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या परिसरात तैनात करण्यात आल्या आहेत. (Parel Chinchpokli Eid Clash)
लक्ष्मी कॉटेज जवळ नेमकं काय घडलं?
परळमधील एका स्थानिक रहिवाशाने माध्यमांशी बोलताना असा दावा केला की, लक्ष्मी कॉटेज परिसरात सुमारे २० मिनिटे 'नारा-ए-तकबीर'ची घोषणाबाजी सुरु होती. परळ ते दादर पर्यंतचा रस्ता जाम करून ठेवला होता. तेव्हा काही धर्मांध मुस्लिमांनी लक्ष्मी कॉटेज जवळील गणेशोत्सव मंडळ आणि गणेश मूर्तीला हानी पोहोचवण्याबाबत धमकी दिली. काहींनी बॅनर फाडल्याची सुद्धा माहिती आहे. त्यानंतर तणाव अधिक वाढला आणि काही हिंदू मुलांनी अशा प्रकारे धमकावणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले. (Parel Chinchpokli Eid Clash)
जागरुक हिंदूंची एक्शनला रिएक्शन
परळ-चिंचपोकळी परिसरात येऊन ईदच्या दिवशी अशा प्रकारे हिंदूविरोधी घोषणाबाजी करण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडलेला नाही. गेली ७-८ वर्ष हे चालत आले आहे. हिंदुबहुल भागात येऊन हिंदूंना उकसवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांच्या एक्शनला यावेळी जागरुक हिंदूंनी दिलेली ही फक्त रिएक्शन आहे. अशी माहिती आहे की, तीन ते चार जणांना केईएम मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, तर भोईवाडा पोलीसांनी चार-पाच जणांना ताब्यात घेतले आहे. मुंबई पोलिसांमुळे रातोरात तीन तासांत परिस्थिती नियंत्रणात आली. सध्या वातावरण शांत आहे. - सतीश तिवारी, भाजप (Parel Chinchpokli Eid Clash)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक