मुंबई,((Devendra Fadnavis Ramgiri Maharaj ): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अहिल्यानगर येथे ‘श्री संत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज यांच्या १७९ व्या अखंड हरिनाम सप्ताहा’च्या निमित्ताने गोदावरी धामचे मठाधिपती पूज्य महंत श्री रामगिरी महाराज यांचा सत्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले. “काही लोक आमचे सद्गुरू रामगिरी महाराजांकडेही धमक्या पाठवतात. अशा प्रकारे धमकी देण्याचे काम कोणी केले तर त्याला नेस्तनाबूत करून टाकू. आम्ही केसालाही धक्का लागू देणार नाही,” असा स्पष्ट इशारा यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सद्गुरू रामगिरी महाराजांना दिल्या जाणाऱ्या धमक्यांवरून संबंधितांना दिला.(Devendra Fadnavis Ramgiri Maharaj )
श्री क्षेत्र धनगरवाडी, पंचक्रोशी, ता. राहाता येथे योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्या १७९व्या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ह.भ.प. रामगिरी महाराज, आमदार अमोल खताळ, विठ्ठलराव लंघे पाटील, रमेश बोरनारे, विवेक कोल्हे, आशुतोष काळे, माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्यासह संत-महंत व हजारो भाविक उपस्थित होते.(Devendra Fadnavis Ramgiri Maharaj )
रामगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या आध्यात्मिक आणि वारकरी परंपरेचा गौरव करत मुख्यमंत्री म्हणाले की, या परंपरेने महाराष्ट्राच्या समाजजीवनात अध्यात्म, संस्कार आणि सज्जनशक्ती जिवंत ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. संतांच्या विचारांमुळे समाजाला मानसिक बळ मिळाले असून, कितीही संकटे आली तरी भारतीयांची श्रद्धा आणि संस्कार बदलले नाहीत.(Devendra Fadnavis Ramgiri Maharaj )
‘हरिनामामुळे सगळे एक होतात’
हरिनाम संकीर्तनाच्या महत्त्वावर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले की, “हरिनामाच्या संकीर्तनामुळे माझ्यातला ‘मी’ मरून जातो आणि आपण सगळे एक होतो. कोणाचाही स्वार्थ त्या ठिकाणी राहत नाही. कोणी जाती-पातीचा विचार करत नाही. सगळे एकमेकांमध्ये विठ्ठल पाहतात.” वारकरी परंपरेने समाजात एकात्मतेची भावना निर्माण केली असून, आजच्या काळातही हरिनाम संकीर्तन हे समाजाला एकत्र आणण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले.(Devendra Fadnavis Ramgiri Maharaj )
‘सज्जनशक्तीच्या बळावर महाराष्ट्र पुढे नेऊ’
महाराष्ट्राचा कारभार करताना समाजातील सर्व घटकांना सोबत घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे फडणवीस म्हणाले. शेतकरी, वारकरी, शेतमजूर, गरीब, दलित आणि आदिवासी या सर्व घटकांच्या सहभागातून महाराष्ट्राच्या विकासाची दिशा निश्चित केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. आध्यात्मिक शक्ती आणि सज्जनशक्तीच्या बळावर महाराष्ट्राला पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करत मुख्यमंत्री म्हणाले की, समाजाने स्वीकारलेल्या सन्मार्गावरून चालण्यापासून कोणतीही शक्ती आपल्याला थांबवू शकणार नाही.(Devendra Fadnavis Ramgiri Maharaj )
“गावाची एकी तर देवाची कृपा नक्की, याचा प्रत्यय या सप्ताहातून येतो. जातीभेद, श्रीमंत-गरीब भेद विसरून विठ्ठलाच्या नामस्मरणासाठी एकत्र येणे हीच संतपरंपरेची खरी ताकद आहे. आठ ते दहा हजार वारकरी १६८ तास एकाच तालात भजन करतात, हा विक्रम असला तरी विठ्ठलभक्तीपुढे कोणताही जागतिक विक्रम छोटाच आहे. लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही; बळीराजाचा सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार आहे. ‘घ्यायचे असेल तर हरिनाम, द्यायचे असेल तर अन्नदान, जगायचे असेल तर नम्रता आणि बुडायचे असेल तर अहंकार’ हा संतांचा संदेश आजही मार्गदर्शक आहे.”(Devendra Fadnavis Ramgiri Maharaj )
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.