मुंबई (Mazgaon Morya Ganpati) : मुंबईतील माझगावचा मोरया गणपती आगमन मिरवणुकीदरम्यान बाप्पाच्या मूर्तीजवळ अंडी फेकणाऱ्या धर्मांध जिहाद्याच्या पोलिसांनी अखेर मुसक्या आवळल्या. दानिश शेर खान असे आरोपीचे नाव असून अवघ्या ३६ तासांत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने फटाक्यांच्या धुरामुळे त्रास झाल्याने रागाच्या भरात ही कृती केल्याचे सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली.(Mazgaon Morya Ganpati)
दि. २३ ऑगस्ट रोजी माझगावचा मोरया गणपती मंडळाचा आगमन सोहळा आयोजित करण्यात आला होता. बाप्पाची मिरवणूक कॉन्टिनेंटल हाईस्ट सोसायटीच्या आवारात येताच एका अज्ञात व्यक्तीने अंडी फेकली होती. सार्वजनिक शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचवण्याचा प्रयत्न झाल्याचे मानून भायखळा पोलिस ठाण्यात संबंधित प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार, आरोपी दानिश शेर खान विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम २९९ आणि १९६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.(Mazgaon Morya Ganpati)
अशी माहिती आहे की, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने पाच विशेष तपास पथके तयार केली आणि स्थानिक परिसरासह इतर ठिकाणी आरोपीचा शोध सुरू केला. तांत्रिक तपास आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्यात आली. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून केवळ ३६ तासांत दानिश शेर खानला अटक करण्यात आली.(Mazgaon Morya Ganpati)
दानिश हा ऑनलाइन ऑर्डर घेऊन परिसरात अंड्यांची होम डिलिव्हरी करण्याचा व्यवसाय करतो. घटनेच्या दिवशीही तो रामभाऊ भोगले मार्गावरील एका इमारतीत अंड्यांची डिलिव्हरी करण्यासाठी गेला होता. त्याचवेळी मिरवणुकीत फोडण्यात येणाऱ्या फटाक्यांच्या धुरामुळे त्याला त्रास झाला. त्यातून निर्माण झालेल्या रागातून त्याने गणेशभक्तांवर अंडी फेकल्याचे तपासात समोर आले आहे.(Mazgaon Morya Ganpati)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक