रूपाली चाकणकर यांच्या बदनामी प्रकरणी १७ जणांवर गुन्हा दाखल; वाचा सविस्तर

    24-Aug-2026   
Rupali Chakankar Defamation Case
 
मुंबई : (Rupali Chakankar Defamation Case) राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा नेत्या रूपाली चाकणकर यांच्याविरोधातील आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी पुणे पोलिसांनी १७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
 
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांचे नाव पुढे आल्यानंतर झालेल्या त्यांच्या बदनामी प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमधे रुपाली ठोंबरे, सुषमा अंधारे, दिपाली सय्यद, संगीता तिवारी, आशा मिरगे, हनुमंत गलगटे, वर्षा कांबळे यांच्यासह योगेश सावंत, मोहसीन शेख आणि महादेव बालगुडे यांचा समावेश आहे. (Rupali Chakankar Defamation Case)
 
नेमके प्रकरण काय?
 
रुपाली चाकणकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अशोक एकनाथ खरात यांच्याशी त्यांची ९ वर्षांपूर्वी एका सामाजिक कार्यक्रमात ओळख झाली होती. मंदिराच्या धार्मिक कार्यक्रमानिमित्त त्या तेथे जात होत्या. दि. १८ मार्च २०२६ रोजी खरात यांना लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक झाली. (Rupali Chakankar Defamation Case)
 
त्यानंतर खरात सोबतचे सार्वजनिक कार्यक्रमातील फोटो-व्हिडिओ वापरून आपल्यावर असंबद्ध आरोप सुरू झाल्याचा दावा चाकणकर यांनी केला आहे. (Rupali Chakankar Defamation Case)
 
दरम्यान, त्यांना सुमारे १९ फेसबुक , इंस्टाग्राम आणि युट्यूब अकाउंटवरून बदनामीकारक, अश्लील आणि धमकीवजा पोस्ट टाकल्याचे आढळले. या प्रकरणी त्यांनी काँग्रेसच्या संगिता तिवारी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे, उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्यासह १७ जणांची नावे तक्रारीत नमूद केली आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. (Rupali Chakankar Defamation Case)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर