मुंबई : (Raigad Activists) रायगड जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत
रायगड जिल्हा काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष पंकज तांबे यांच्यासह रायगड जिल्ह्यातील अनेक माजी सरपंचांनी व कार्यकत्यांनी सोमवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. (Raigad Activists)
भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या सर्वांचे पक्षामध्ये स्वागत केले. भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. योगेश सागर, आ. प्रवीण दरेकर, निजामपूर मंडल अध्यक्ष युवराज मुंढे, सरचिटणीस निलेश राशीनकर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष मंदार महामुनकर, बापुसाहेब सोनगिरे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. (Raigad Activists)
या सर्व कार्यकर्त्यांनी देशाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासाला साथ देण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. या सर्वांचा उचित सन्मान राखला जाईल असे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितले. (Raigad Activists)
भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये निजामपूरचे स्वप्नील शिर्के, वावे दिवालीचे माजी सरपंच शरद कदम, निलजचे माजी सरपंच प्रमोद जाधव, शिखलीचे माजी सरपंच विजय नलावडे, सयाजी नलावडे, ॲड. रुपेश वाढवळ, अनंत मोरे, गजानन चव्हाण, प्रकाश शिंदे, प्रताप कडू, समीर म्हसकर आदी असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे. (Raigad Activists)