मुंबईतील शाळांच्या तपासणीसाठी मनुष्यबळ अपुरे; तातडीने ८९ रिक्त पदे भरण्याचे मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांचे निर्देश

    24-Aug-2026   
Mumbai Schools Ashish Shelar
 
मुंबई : (Mumbai Schools Ashish Shelar) मुंबई महापालिका क्षेत्रातील शासनाच्या माध्यमिक शाळा, पालिकेच्या तसेच अनुदानित व विना अनुदानित प्राथमिक शाळांमधील भौतिक सुविधा तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची एकुण ८९ पदे रिक्त आहेत. ही बाब चिंताजनक असून ही रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी, असे निर्देश मुंबई उपनगर पालकमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी सोमवारी दिले.
 
मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रातील शासनाच्या माध्यमिक शाळा, पालिकेच्या तसेच अनुदानित व विना अनुदानित प्राथमिक शाळांमधील भौतिक सुविधा तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची एकुण ८९ पदे रिक्त आहेत. ही बाब चिंताजनक असून ही रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी, असे निर्देश मुंबई उपनगर पालकमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी सोमवारी दिले.(Mumbai Schools Ashish Shelar)
 
मुंबई शहर आणि उपनगरातील सर्व शाळांमधील पायाभूत सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि उपलब्ध सोयी-सुविधांचा आढावा घेण्यासाठी त्यांनी शासन व महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि सुरक्षित शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी शाळांच्या भौतिक सुविधांची नियमित तपासणी आणि देखरेख याबाबत त्यांनी संपूर्ण आढावा घेतला.(Mumbai Schools Ashish Shelar)
 
मुंबई महापालिका क्षेत्रात राज्य शासनाच्या मान्यतेने पूर्व उपनगरातील २४०, पश्चिम उपनगरातील २६५ अशा एकुण ५०५ माध्यमिक शाळा असून त्यांची भौतिक सुविधा तपासणी करण्यासाठी केवळ पंधरा शिक्षण उपनिरीक्षक व सहाय्यक उपनिरीक्षक असून यांची १८ पदे रिक्त आहेत. तर मुंबई महापालिकेच्या १ हजार १३२ प्राथमिक शाळा असून १ खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शाळा आहेत. अशा एकुण २ हजार १३२ शाळांच्या भौतिक सुविधा तपासणीसाठी असलेले विभाग निरिक्षक केवळ ११ असून तब्बल ७१ पदे रिक्त आहेत.(Mumbai Schools Ashish Shelar)
 
अधिकाऱ्यांची ८९ पदे रिक्त
 
शाळांमध्ये स्वच्छता गृहे, इमारत, वर्ग खोल्या, लाईट, पाणी, सुरक्षा यासारख्या १० विविध भौतिक सुविधांची तपासणी महापालिका आणि राज्य शासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांमार्फत दर तीन वर्षांनी होते. मात्र, या पदावरील अधिकाऱ्यांची ८९ पदे रिक्त असल्याचे आजच्या बैठकीत निदर्शनास आले. मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असल्याने शाळांच्या भौतिक सुविधा आणि शैक्षणिक व्यवस्थेची प्रभावी व नियमित तपासणी करण्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. ज्याचा परिणाम शैक्षणिक व्यवस्थेवर होऊ शकतो.(Mumbai Schools Ashish Shelar)
 
म्हणून तपासणी अधिकाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्याची प्रक्रिया सुरू करुन शाळांच्या तपासणीची यंत्रणा अधिक सक्षम करावी, असे निर्देश मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.(Mumbai Schools Ashish Shelar)
 
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड नको
 
शाळांच्या पायाभूत सुविधांमध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड होऊ नये आणि प्रत्येक शाळेत आवश्यक त्या मूलभूत सुविधा उपलब्ध असाव्यात, यासाठी नियमित तपासणी, अहवाल आणि त्यावर तातडीने कार्यवाही करण्याची प्रभावी यंत्रणा उभारण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.(Mumbai Schools Ashish Shelar)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर