मुंबई (Mazgaon Incident) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील गणपती आगमन मिरवणुकांना सुरुवात झाली असतानाच माझगाव परिसरात रविवार, दि. २३ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास तणावाचे वातावरण निर्माण झाले. ‘माझगावचा मोरया’ गणपतीच्या आगमन मिरवणुकीवर इमारतीवरून अंडी फेकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर मोठ्या संख्येने नागरिक आणि गणेशभक्त घटनास्थळी जमा झाले. त्यामुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, गणपतीची आगमन मिरवणूक परिसरातून जात असताना जवळच्या इमारतीतून अंडी फेकण्यात आल्याचा दावा स्थानिक नागरिक आणि गणेशभक्तांकडून करण्यात आला. या प्रकाराची माहिती मिळताच घटनास्थळी मोठी गर्दी जमली. यावेळी काही जणांमध्ये जोरदार वादावादी झाली. (Mazgaon Incident)
#WATCH | Mumbai, Maharashtra: Heavy police security deployed in Mumbai’s Mazgaon area after Ganesh festival organisers alleged that eggs were hurled at their procession during the idol's arrival. pic.twitter.com/nGqunMrpu9
परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन करत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, CCTV फुटेजच्या माध्यमातून संबंधित व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. (Mazgaon Incident)
गणेशभक्तांनी या घटनेबाबत नाराजी व्यक्त करत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू असून, नेमके अंडे कुठून आणि कोणी फेकले, याचा शोध घेतला जात आहे.
Mumbai, Maharashtra: Deputy Secretary of Mazgaon Cha Maurya Ganpati Mandal Vivek Rane says, "While we were organising the Ganpati Aagaman procession, there is a building just 30 to 40 metres away from the pandal. Some anti-social elements from a nearby building opposite the… pic.twitter.com/C3oU7eFqkh
मुंबईत गणपती आगमन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील भागांमध्ये पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. माझगावमध्ये घडलेल्या घटनेनंतर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली असून, नागरिकांनी संयम राखण्याचे आवाहन केले आहे. (Mazgaon Incident)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.