माझगाव अंडीफेक प्रकरणावर नितेश राणेंचा संताप

Mazgaon, egg-throwing, Nitesh Rane, Ganeshotsav, Ganeshotsav procession, Mazgaon Ganpati, Mumbai news, Mumbai Ganeshotsav
 
मुंबई : (Mazgaon Egg-Throwing Incident) माझगाव परिसरात गणेशोत्सवाच्या आगमन मिरवणुकीदरम्यान अंडीफेक झाल्याच्या घटनेवरून कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. सर्वधर्म समभाव आणि गंगा-जमुना तहजीबची भाषा करणाऱ्यांनी या घटनेवर भूमिका स्पष्ट करावी, असा सवाल करत राणे यांनी संबंधितांना कठोर इशारा दिला.
 
नितेश राणे म्हणाले, “आम्ही नेहमी बोलत आलेलो आहे की आपल्या देशांमध्ये भाईचारा, सर्वधर्म समभाव, गंगा-जमुना-तहजीब बोलणारे आता नेमके कुठे लपलेले आहेत? आपल्या राष्ट्रांमध्ये अगर गंगा-जमुना तहजीब आणि भाईचारा असेल तर ज्यांना ईद आणि मोहरम साजरा करण्याचा अधिकार आहे, त्यांना गणेश उत्सव आणि हिंदू सण त्याच पद्धतीने हिंदूंना साजरा करण्याचा अधिकार नाही का?” (Mazgaon Egg-Throwing Incident)
 
ते पुढे म्हणाले, “ईद, मोहरम या सणांच्या वेळी अशी एक घटना कोणीही दाखवावी किंवा आपण लोकांनी कुठला रिपोर्ट केला असेल. ज्यात ईद, मोहरम आणि ह्यांच्या कुठल्याही सणांच्या काळात कुठल्याही हिंदूंनी त्यांच्यावर चपल मारली, त्याच्यावर अंडी मारली, त्याच्यावर दगड मारले अशी एक घटना दाखवा. कुठलीच भेटणार नाही. मग नेमकं गणेश उत्सवाची मिरवणूक निघत असेल मग ह्यांना अंडी मारण्याचा विचार डोक्यात का येतात?” (Mazgaon Egg-Throwing Incident)
 
“मग अशा ह्या जिहाद्यांची ही घाण आम्ही मुंबईमध्ये का ठेवायची?” असा सवाल करत राणे म्हणाले, “तुम्हाला आमच्याच देशामध्ये राहून, आमचेच हिंदू सण सहन होत नसतील. ज्या देशामध्ये नव्वद टक्के हिंदू राहतात, त्या हिंदू राष्ट्रांमध्ये राहूनच तुम्ही हिंदू सणांवर आमच्या गणेश उत्सवाच्या मिरवणुकीवर तुम्ही दगडं मारत असाल, अंडी मारत असाल तर पोलीस आपली कारवाई नक्की करेल आणि केली पण आहे रात्री. सगळ्या केसेस घेतलेल्या आहेत.” (Mazgaon Egg-Throwing Incident)
 
हिंदूंच्या भावनांबाबत बोलताना राणे यांनी पुढे इशारा दिला, “पण हिंदूंच्या ज्या भावना आहेत. हिंदूंवर जे सातत्याने अशा पद्धतीचे ज्या प्रकार होतात. मग असे जे काही जिहादी ज्या बिळामध्ये लपलेले आहेत. त्यांना आम्ही सोडणार नाही. आम्हाला अशा पद्धतीचे प्रकार आमच्या हिंदुत्ववादी विचाराचे सरकार असताना सहन करणार नाही.” (Mazgaon Egg-Throwing Incident)
“आमच्या गणेश उत्सवाच्या मिरवणुकावर होत असतील तर ईद तर ईद पण कुठे तरी येते हेच्या लक्षात ठेवावं. ईदचा दिवस पण येईल. मोहरमचा दिवस पण येईल,” असे म्हणत राणे यांनी पुढे भगवद्गीतेचा संदर्भ दिला. “आमच्या भगवद्गीतेमध्ये शस्त्र उचलण्याची पण मुभा दिलेली आहे. धर्म रक्षणासाठी आम्ही शस्त्र उचलू शकतो असं आमच्या भगवद्गीतेमध्ये लिहिलेलं आहे,”असा इशाराही राणेंनी यावेळी दिला. (Mazgaon Egg-Throwing Incident)
 
राणे म्हणाले, “म्हणून कायद्याचं पालन करण्याचा सगळा ठेका हा काय फक्त हिंदूंनीच घेतलेला नाही. सर्वधर्म समभाव सेक्युलर फिक्युलर हे सगळे जे काही टेपरेकॉर्डर चालवणारे आता कुठल्या बिळात लपलेले आहेत.” (Mazgaon Egg-Throwing Incident)
 
या घटनेतील आरोपींची नावे पोलिसांपर्यंत पोहोचल्याचा दावा करत राणे म्हणाले, “हिंदू समाजाकडे वाकड्या नजरेने बघणारे हे जे जिहादी त्या बिल्डींगमध्ये लपलेले आहेत. त्यांची नाव आमच्याकडे आलेली आहेत. आता पुढे बघा कसे कार्यक्रम होतात.”
 
पोलिसांच्या कारवाईबाबत राणे यांनी स्पष्ट केले, “ज्यांनी कोणी अंडी फेकली आहे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला. पोलिसांनी काल रात्रीच गुन्हा दाखल केलेला आहे. संबंधितांवर ते लोकही आयडेंटिफाय झालेले आहेत.”
 
अंडीफेकीच्या घटनेवरून धार्मिक संदर्भ देत राणे यांनी सवाल केला, “हे समोर येऊन लढणार नाहीत. लपून अंडी मारणार, लपून चपलं मारणार. ह्यालाच काय आपण इस्लाम धर्म म्हणतो का? दुसऱ्या धर्मांवर दुसऱ्या धर्माच्या सणासुदीवर उत्सवांवर दगडी मारणं हे तुमच्या कुराणमध्ये लिहिलं आहे का? सांगावं त्यांनी आम्हाला. मग आम्ही जे बोलतोय त्याच्यामध्ये चूक काय? आम्ही जी हिंदूंची बाजू घेतो, त्याच्यामध्ये चूक काय हे सांगावं. आता आम्ही कुठल्याही ईदच्या मिरवणुकीवर, सणांवर काही केलेलं नाही. तुम्हाला कधीच कुठल्या सणासुदीला साजरा करण्यामध्ये आम्ही हस्तक्षेप केला नाही. पोलिसांची कारवाई होईलच. पण तुम्ही आमच्या रडारवर आलेला आहात हे लक्षात ठेवा,” असा इशाराही राणे यांनी दिला. (Mazgaon Egg-Throwing Incident)
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही या प्रकरणावर बारकाईने लक्ष असल्याचे सांगताना राणे म्हणाले, “आदरणीय मुख्यमंत्री या सगळ्या गोष्टींवर फार बारीक लक्ष ठेवून आहेत. शेवटी मी सांगितलेलं आहे वारंवार आपल्या राज्याला एक कडवट हिंदुत्ववादी म्हणून एक मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस जी तिथे बसलेले आहेत. हिंदूंवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय हा सहन केला जाणार नाही. हे सरकार हिंदूंनी निवडून आणलेलं आहे. हिंदूंच्या रक्षणासाठी आमचं सरकार आहे.”
 
पुढे पाकिस्तानचा संदर्भ देत राणे म्हणाले, “म्हणून अशा जिहाद्यांना कोणीही त्यांच्या पाकिस्तानमधील अब्बा अगर सुरक्षला देत असतील, हवा भरत असतील तर ह्या जिहाद्यांच्या ह्या हिरव्या सापांना ठेचण्याचे सगळे कार्यक्रम आमच्याकडे आहेत हे लक्षात ठेवा. याच्या मागे, पुढे, खालती, वरती जे आहेत त्या सगळ्यांपर्यंत आम्ही पोहोचलो. यांचे कोण कोण पाकिस्तानमध्ये बसलेले अब्बा आहे जे यांना जिहाद शिकवतात,” असेही राणे म्हणाले.
 
पाकिस्तानचा उल्लेख करत राणे यांनी पुढे म्हटले, “आता तुम्हाला पाकिस्तानमध्ये बसून तुम्ही कधी कुठल्या ईदच्या मोहरा ईदच्या मिरवणुकीवर तुम्ही अंडी मारण्याची हिम्मत कराल का? जिवंत कापून टाकतील तुम्हाला.” बांगलादेशातील परिस्थितीचा संदर्भ देत राणे म्हणाले, “बघा बांगलादेशमध्ये काय चाललंय. बांगलादेशमध्ये राजरोस पद्धतीने हिंदूंना मारण्याचा कार्यक्रम चालू आहे. कालच एक हिंदू चार हिंदूंना मारलंय. मग काही इस्लामिक राष्ट्रांमध्ये असे करण्याची हिम्मत कोण करणार नाही.” (Mazgaon Egg-Throwing Incident)
 
“ही सगळी नाटकं मग आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आम्ही सहन करायची जिथे आमच्या हिंदू सणांच्या वेळीच तुम्हाला अंडी मारायची आहे,” असा सवाल करत राणे यांनी पुढे म्हटले, “मग तुमच्या ईदच्या मिरवणुकीमध्ये कुठे अंडी पडली तर? तिथे डोकी फुटली तर? मग सुरू कोणी केलं? मग उद्या आमच्या हिंदू समाज ज्यांनी त्याच्यावर तिसरा डोळा उघडला तर? म्हणून ही घटना लक्षात ठेवायची. आमच्या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे.” (Mazgaon Egg-Throwing Incident)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर