संत रविदासांचा समतेचा संदेश समाज परिवर्तनाची दिशा देणारा : नितीन नबीन

    24-Aug-2026   
Sant Ravidas 650th birth anniversary 
 
मुंबई : (Equality) संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘समरसता संकल्प अभियान आणि पावन माती कलश वितरण’ कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार नितीन नबीन यांनी संत रविदास महाराजांच्या विचारांचा समाजजीवनात व्यापक प्रसार करण्याचे आवाहन केले.
 
राष्ट्रीय अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष तथा राज्यसभा खासदार शिवेश कुमार यांनीही यावेळी संत रविदास महाराजांच्या समतावादी विचारांची भूमिका मांडली. (Equality)
 
नितीन नबीन म्हणाले की, संत रविदास महाराजांनी सामाजिक भेदभावाला विरोध करत समानता, बंधुभाव आणि श्रमप्रतिष्ठेचा संदेश दिला. प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार असून समाजातील सर्व घटकांना समान संधी मिळणे आवश्यक आहे, हा त्यांच्या विचारांचा गाभा आहे. त्यांच्या विचारांमधून सामाजिक समरसतेच्या दिशेने काम करण्याची प्रेरणा मिळते. (Equality)
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक न्याय, गरीब कल्याण आणि सर्व घटकांच्या विकासासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू असल्याचे नबीन यांनी सांगितले. संत रविदास महाराजांनी मांडलेल्या समताधिष्ठित समाजाच्या विचारांना पुढे नेण्यासाठी सामाजिक एकतेची भावना अधिक दृढ करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. (Equality)
 
राष्ट्रीय अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष तथा राज्यसभा खासदार शिवेश कुमार म्हणाले की, संत रविदास महाराजांचे विचार माणसामाणसातील भेद दूर करून समानतेवर आधारित समाजाची उभारणी करण्याचा मार्ग दाखवतात. त्यांचे विचार एका विशिष्ट समाजापुरते मर्यादित नसून सामाजिक परिवर्तनाची व्यापक भूमिका मांडणारे आहेत. संत रविदास महाराजांचा समतेचा आणि बंधुभावाचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. (Equality)
 
कार्यक्रमास दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष लालसिंह आर्य, दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष हर्ष मल्होत्रा, माजी राष्ट्रीय सरचिटणीस दुष्यंत कुमार गौतम, खासदार, दिल्ली सरकारमधील मंत्री, लोकप्रतिनिधी, पक्ष पदाधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. (Equality)
 
‘पावन माती कलश’ वितरणातून सामाजिक एकता आणि समरसतेचा संदेश देण्यात आला. संत रविदास महाराजांच्या समानता, सामाजिक न्याय आणि बंधुभावाच्या विचारांचा प्रसार करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. (Equality)
 
 




सागर देवरे

सागर देवरे, सामाजिक न्याय प्रतिनिधी, दैनिक मुंबई तरुण भारत.
शिक्षण : बी.ए. एल.एल.बी. (अभ्यासक्रम सुरू).
सामाजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असून विविध सामाजिक, शैक्षणिक व अन्य चळवळींवर वृत्तांकनाचा अनुभव.
समुदायाधारित प्रश्नांवर सातत्याने अभ्यासपूर्ण लेखन.
सामाजिक न्याय, हिंदू बहुजन समाजाचे प्रश्न व विद्यार्थी चळवळींवर विशेष लेखन.
संबंधित मजकूर