महिला आरक्षणावरून फडणवीसांचा चिदंबरम यांच्यावर घणाघाती पलटवार

‘निवडक स्मरणशक्तीचा कलाविष्कार मलाही शिकायचा आहे’; २०२९ मध्ये महिला आरक्षण लागू करण्याचा मार्ग काँग्रेसनेच रोखल्याचा आरोप

Devendra Fadnavis Women’s Reservation
 
 
मुंबई, (Devendra Fadnavis Women’s Reservation) : महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना घणाघाती प्रत्युत्तर दिले आहे. “प्रिय पी. चिदंबरमजी, मलाही निवडक स्मरणशक्तीचा कलाविष्कार आत्मसात करायचा आहे,” अशा बोचऱ्या शब्दांत फडणवीस यांनी चिदंबरम यांच्यावर निशाणा साधला.(Devendra Fadnavis Women’s Reservation)
 
फडणवीस यांनी म्हटले आहे की, २०२३ मधील १०६वी घटनादुरुस्ती म्हणजेच ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ आपण वाचला आणि त्याला मतदानही केले आहे. या कायद्यात महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी स्पष्ट पूर्वअट नमूद करण्यात आली आहे. महिलांसाठी राखीव जागांची तरतूद मतदारसंघ पुनर्रचनेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच लागू होईल आणि ही पुनर्रचना कायदा लागू झाल्यानंतर घेतल्या जाणाऱ्या पहिल्या जनगणनेच्या आधारे केली जाईल, अशी तरतूद असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.(Devendra Fadnavis Women’s Reservation)
 
“कोविडमुळे जनगणना लांबली, हे आपण सर्व जाणतो. कायदा लागू झाल्यानंतरची जनगणना आणि त्यानंतरची मतदारसंघ पुनर्रचना पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा केल्यास २०२९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी महिला आरक्षण लागू होऊ शकणार नाही,” असे फडणवीस यांनी म्हटले आहे.(Devendra Fadnavis Women’s Reservation)
 
 
यामुळे २०२९च्या लोकसभा निवडणुकीतच महिला आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारने २०२६मध्ये २०११च्या आधीच प्रकाशित झालेल्या जनगणना आकडेवारीच्या आधारे मतदारसंघ पुनर्रचना करण्याचा मार्ग मोकळा करणे, लोकसभेची सदस्यसंख्या वाढविणे आणि महिला आरक्षण प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याच्या दिशेने विधेयके आणली, असा दावा फडणवीस यांनी केला.(Devendra Fadnavis Women’s Reservation)
 
मात्र, या प्रयत्नांना राहुल गांधी आणि काँग्रेसने विरोध केल्याचा आरोप करत फडणवीस म्हणाले, “तुमचे नेते राहुल गांधी आणि काँग्रेसने या प्रयत्नाला विरोध केला आणि संसदेत त्याचा पराभव सुनिश्चित केला. त्यामुळे २०२९पर्यंत महिला आरक्षण लागू करण्याचा मार्गच रोखला गेला.”(Devendra Fadnavis Women’s Reservation)
 
२०२३मध्ये काँग्रेसने १०६व्या घटनादुरुस्तीला दिलेल्या पाठिंब्यावरही फडणवीस यांनी जोरदार टीका केली.
 
“२०२३मध्ये तुम्ही या घटनादुरुस्तीला पाठिंबा दिलात, कारण एनडीएकडे पुरेसे संख्याबळ होते आणि तुमच्या पाठिंब्याशिवायही हे विधेयक मंजूर होणार होते. त्यामुळे ‘बहती गंगा में हाथ धो लो’ अशी भूमिका घेतली,” असा टोला त्यांनी लगावला. “पण महिला आरक्षणाच्या लवकर अंमलबजावणीची खरी संधी निर्माण झाली, त्याक्षणी काँग्रेसचे खरे रंग समोर आले,”असा घणाघात फडणवीस यांनी केला.(Devendra Fadnavis Women’s Reservation)
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महिला आरक्षणाची अंमलबजावणी करण्याच्या सरकारच्या निर्धाराचा पुनरुच्चार करत फडणवीस म्हणाले, “आमचे नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, २०२९च्या लोकसभा निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाहीत.” अखेर फडणवीस यांनी काँग्रेसला थेट जाब विचारत म्हटले, “पुन्हा सांगतो, इधर-उधर की बात ना करो, हे सांगा, आमच्या माता-भगिनींचा हक्क का रोखला?” (Devendra Fadnavis Women’s Reservation)
 
 
 
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर