नाशिक : (Caste Census Victory)केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला असून, हा निर्णय ओबीसी समाजाच्या मागणीसाठी झालेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे यश असल्याचे प्रतिपादन मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक येथे केले. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राज्यस्तरीय बैठकीत ते बोलत होते.
यावेळी राज्यभरातून आलेल्या प्रमुख पदाधिकारी आणि समता सैनिकांशी संवाद साधून संघटनेच्या आगामी वाटचालीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. परिषदेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. जातनिहाय जनगणनेची अधिसूचना जाहीर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या अभिनंदनाचा ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला. (Caste Census Victory)
जातनिहाय जनगणनेसाठी समता परिषदेने सुरुवातीपासून आवाज उठवून आंदोलने केली. माजी खासदार समीर भुजबळ यांनी संसदेत ओबीसी खासदारांना एकत्र आणून ही मागणी लावून धरली होती. केंद्र सरकारचा निर्णय हा या पाठपुराव्याचे यश असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. (Caste Census Victory)
महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त देशभर सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. आरक्षण हा गरिबी हटावाचा कार्यक्रम नसून वंचित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणारा सामाजिक न्यायाचा कार्यक्रम असल्याचे सांगत महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन करण्यात आले. (Caste Census Victory)
या बैठकीस आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, प्रदेश कार्याध्यक्ष बापू भुजबळ, डॉ. कैलास कमोद, ईश्वर बाळबुधे, ॲड. राजेंद्र महाडोळे, प्रा. सत्संग मुंडे, ॲड. मंगेश ससाणे, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, सदानंद मंडलिक, गुफरान शब्बीर अन्सारी, डॉ. नागेश गवळी, डॉ. स्नेहा सोनकाटे, प्रा. दिवाकर गमे, शंकरराव लिंगे, सुनील मेटे, मंजिरी धाडगे, माया इरतकर, प्रा. संतोष वीरकर, समाधान जेजुरकर, रविंद्र खरात आणि ॲड. सुभाष राऊत यांच्यासह राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (Caste Census Victory)