मुंबई : (Amravati NICU Fire) "अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात सोमवार दि.२४ रोजी पहाटेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दु:खदायक आहे.या आगीच्या दुर्घटनेत आपल्या जवळच्या निष्पाप जीवांना गमावलेल्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. हे तीव्र दु:ख सहन करण्याचे त्यांना बळ मिळो. (Amravati NICU Fire)
तसेच जखमी बालकांना लवकर आराम पडो ही ईश्वरचरणी प्रार्थना."अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवार दि.२४ रोजी दिली आहे. अमरावती येथील जिल्हा महिला रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीनंतर झालेल्या दुर्घटनेवर ते बोलत होते.(Amravati NICU Fire)
"रूग्णालय प्रशासनाने वेळीच सतर्कता दाखवल्याने ३६ बालकांना वाचविण्यात आले. तरी, या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.या घटनेतील मृत बालकांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपये मदत देण्यात येणार आहे. तसेच, जखमींवरील खर्च शासकीय खर्चातून केला जाईल.(Amravati NICU Fire)
राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना तात्काळ घटनास्थळी जाण्याची सूचना मी केली आहे. ते स्वतः या परिस्थितीवर जातीने लक्ष देत आहेत."असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.(Amravati NICU Fire)