मुंबई : (Action Taken For Not Knowing Marathi) राज्यात ऑटोरिक्षा, टॅक्सी चालवणाऱ्या मराठी वाहन चालकांना मराठी भाषेचे जरूरी ज्ञान असणे आवश्यक करण्यात आले होते. त्यासाठी त्यांना मराठी शिकण्यासाठी प्रशिक्षण वर्गासोबतच तीन महिन्याचा कालावधी देखील देण्यात आला होता.
१५ ऑगस्ट रोजी त्याची मुदत संपल्यानंतर अजूनही मराठी न आलेल्या वाहनधारकांवर कारवाई सुरू झाली असून आतापर्यंत राज्यात ७७७ अमराठी वाहनधारकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवार दि. २१ रोजी दिली.(Action Taken For Not Knowing Marathi)
यामध्ये मुंबई महानगर क्षेत्रातील एकूण ३९४२ वाहनधारकांची तपासणी करण्यात आली असून त्यातील ७२२ वाहनधारकांना मराठी भाषेचे ज्ञान नसल्याचे समोर आले आहे त्यांना नोटीस देखील जारी करण्यात आली आहे. तर संपूर्ण राज्यात मुंबई महानगर क्षेत्रासह ७७७ वाहनधारकांना मराठीचे ज्ञान नसल्याने नोटीस जारी करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात एकूण ५२११ वाहनधारकांची मराठी भाषा ज्ञान तपासणी करण्यात आली.(Action Taken For Not Knowing Marathi)