'पावसाच्या पाऊलखुणा' उमटणार कवितेतून; एसएनडीटी महिला विद्यापीठ चर्चगेट येथे रंगणार विशेष काव्य मैफील

    23-Aug-2026
Marathi Poetry
 
मुंबई : (Marathi Poetry) पावसाळ्याच्या रम्य वातावरणाचा आणि निसर्गाच्या विविध रूपांचा काव्यमय अनुभव देण्यासाठी एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागातर्फे ‘पावसाच्या पाऊलखुणा’ या विशेष कवितेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १ वाजता विद्यापीठाच्या वर्गखोली क्र. ६०९ (सहावा मजला) येथे हा कार्यक्रम होणार आहे. विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. (Marathi Poetry)
 
पावसाळा, निसर्ग, मातीचा सुगंध, आठवणी आणि मानवी भावविश्व यांना कवितेच्या माध्यमातून अनुभवण्याची संधी या कार्यक्रमातून साहित्यप्रेमींना मिळणार आहे. मराठी साहित्यात पावसाचे विविधांगी चित्रण, पावसाशी जोडलेल्या भावना आणि निसर्गानुभव यावर कार्यक्रमात काव्यमय सादरीकरण होणार आहे. (Marathi Poetry)
 
या कार्यक्रमाला कवयत्री यामिनी दळवी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.(Marathi Poetry)
 
या वेळी मराठी विभागाचे प्रमुख डॉ. सुनील रामटेके, डॉ. अनुराधा पोतदार आणि डॉ. राजश्री पाटील यांची उपस्थिती असणार आहेत.
 
पदव्युत्तर मराठी विभागाच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमातून साहित्य, निसर्ग आणि संवेदना यांचा सुरेख संगम अनुभवायला मिळणार असून विद्यार्थी, शिक्षक आणि साहित्यप्रेमींनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे. (Marathi Poetry)
 
 




संबंधित मजकूर