मुंबई : (Mumbai Airport Terminal 2) भाजपप्रणित अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल २ येथे सोमवारी, २४ ऑगस्ट रोजी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. याच दिवशी सहार कार्गो संकुलातील संघाच्या नव्या कार्गो कार्यालयाचा उद्घाटन सोहळाही पार पडणार आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, भाजप मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम आणि आमदार पराग अळवणी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. (Mumbai Airport Terminal 2)
टर्मिनल २ येथे महापूजा
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ येथील पिलर क्रमांक ०४ ए समोरील पी-६ वेस्ट परिसरातील संघाच्या कार्यालयात सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायण महापूजा होईल. (Mumbai Airport Terminal 2)
यानंतर अंधेरी पूर्वेतील सहार कार्गो संकुलातील रॉय अपार्टमेंटमधील शॉप क्रमांक २ येथे सकाळी १०.३० वाजता नव्या कार्गो कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. (Mumbai Airport Terminal 2)
कामगारांना उपस्थित राहण्याचे आवाहन
या कार्यक्रमाचे आयोजन संघाच्या वतीने करण्यात आले असून, कामगार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन संघाचे सरचिटणीस सुहास माटे यांनी केले आहे. (Mumbai Airport Terminal 2)
कामगारांच्या संघटनात्मक कामकाजासाठी आणि त्यांच्या विविध प्रश्नांवर प्रभावीपणे पाठपुरावा करण्यासाठी हे कार्यालय उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे. (Mumbai Airport Terminal 2)