मुलांच्या आकांक्षा बदलत आहेत,त्यानुसार शाळाही बदलल्या पाहिजेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश - वाचा सविस्तर

    23-Aug-2026
Eknath Shinde, modernization of schools, Maharashtra education, school education, quality education, future-oriented education, teacher training, educational reforms, schools in Maharashtra, education system
 
मुंबई : (Eknath Shinde Modernization Of Schools) “आपल्या मुलांच्या आकांक्षा बदलत आहेत, त्यांची स्वप्ने बदलत आहेत. त्यानुसार आपल्या शाळाही बदलल्या पाहिजेत. महाराष्ट्रातील प्रत्येक मुलाला भविष्यातील संधी आणि आव्हानांसाठी तयार करणारी आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि भविष्यवेधी शिक्षणव्यवस्था आपण निर्माण केली पाहिजे.”असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
 
विशेष बैठक
 
शालेय शिक्षण विभागाचा सर्वांगीण आढावा घेण्यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी विशेष बैठक शनिवार दि.२२ रोजी पार पडली यानंतर ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, खासदार मिलिंद देवरा, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल आणि शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.(Eknath Shinde Modernization Of Schools)
 
शाळांचे आधुनिकीकरण
 
राज्यातील शाळांचे आधुनिकीकरण आणि शिक्षण व्यवस्थेत प्रत्यक्ष, दृश्यमान आणि गुणवत्तापूर्ण बदल घडवून आणण्यासाठी स्पष्ट, सर्वसमावेशक आणि कालबद्ध कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.(Eknath Shinde Modernization Of Schools)
 
शिक्षणविषयक योजना महाराष्ट्रात प्रभावी आणि गतिमान
 
“या कृती आराखड्यात शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांना सोबत घेणे, शिक्षकांसाठी प्रशिक्षण, प्रोत्साहन आणि प्रेरणादायी उपक्रम राबवणे तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन व योग्य सन्मान देणे, यावर विशेष भर देण्यात यावा. केंद्र सरकारच्या विविध शिक्षणविषयक योजनांची महाराष्ट्रात प्रभावी आणि गतिमान अंमलबजावणी करावी.” असेही एकनाथ शिंदे यांनी सुचवले.(Eknath Shinde Modernization Of Schools)
 
 




संबंधित मजकूर