भुलेश्वरचा राजा' गणेशोत्सव मंडळाच्या आगमन दुर्घटनेत जखमींची एकनाथ शिंदे यांनी घेतली भेट

    23-Aug-2026
Bhuleshwar-cha Raja Accident
 
मुंबई : (Bhuleshwar-cha Raja Accident) मुंबईतील 'भुलेश्वरचा राजा' गणेशोत्सव मंडळाच्या आगमन मिरवणुकीवेळी झालेल्या दुर्घटनेत जखमी झालेल्या कार्यकर्त्यांची शनिवार दि.२२ रोजी मध्यरात्री गिरगावच्या एचएन रिलायन्स रुग्णालयात जाऊन शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली.यावेळी खासदार मिलिंद देवरा उपस्थित होते.
 
यावेळी रुग्णालयात दाखल असलेल्या जखमी कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्यावर सुरु असलेल्या उपचारांची त्यांनी माहिती जाणून घेतली. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून गरज पडल्यास कार्यकर्त्यांना सर्वतोपरी मदत करू असे एकनाथ शिंदे यांनी आश्वस्त केले.(Bhuleshwar-cha Raja Accident)
 
 




संबंधित मजकूर