राहुल गांधींचा कार्यक्रम बोगस; पक्ष वाचवण्यासाठी युवकांचे कार्यक्रम घेतले जातात — मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

    22-Aug-2026   
 
 Rahul Gandhi Event
 
मुंबई (Rahul Gandhi Event) : राहुल गांधींचा कार्यक्रम बोगस असून काँग्रेस पक्ष वाचवण्यासाठी ते युवकांचे कार्यक्रम घेत आहेत, अशी टीका महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
 
माध्यमांशी बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "पक्षीय कार्यक्रम घेऊन युवकांना राजकारणाचे बळी करत आहेत. हा काही एनजीओचा कार्यक्रम आहे का? निसटलेला जनाधार पुन्हा परत यावा, यासाठी हे कार्यक्रम आहेत. त्यामुळे विजय वडेट्टीवार यांनी राजकारणाकरिता युवकांचा वापर करून त्यांची माथी भडकावू नये. युवकांना आज देशाचे संस्कार, विरासत, संस्कृती, विज्ञान, तंत्रज्ञान आणि आधुनिकीकरणासह पुढे न्यायचे आहे. ते विकसित भारताचे नागरिक आहेत. त्यामुळे राजकारणासाठी युवकांचा वापर होऊ नये," असे ते म्हणाले. (Rahul Gandhi Event)
 

शेतकऱ्याला लागणाऱ्या मातीवर रॉयल्टी घेणार नाही
 
"महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महसुल खात्याने अत्यंत चांगला निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचे सपाटीकरण करायचे असेल, पडीत जमीन शेतीउपयोगी करायची असेल तर त्यासाठी त्यांना माती लागते. अशावेळी आमचे अधिकारी शेतकऱ्यांकडून रॉयल्टी घेतात, त्यांच्यावर गुन्हे दाखल करतात. पण आता मात्र, राज्यात कुठल्याही शेतकऱ्याचे ट्रॅक्टर पकडले जाणार नाही. शेतकऱ्याला लागणाऱ्या मातीवर रॉयल्टी घेण्यात येणार नाही. शेतकऱ्याला लागणारे कुठलेही उपयोगी साहित्य वापरताना त्याला अडवणूक करू नये, असे आदेश तहसीलदार, तलाठी आणि पोलिसांना दिले आहेत. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे," असेही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. (Rahul Gandhi Event)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर