मुंबई (Prithviraj Chavan Shiv Sena Alliance) : "काँग्रेसने शिवसेनेसोबत जाणे मान्य होणार नव्हते त्यामुळे ते २०१४ साली महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव मी फेटाळला होता."असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवार दि. २१ ऑगस्ट रोजी केला.
"शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करावं हा प्रस्ताव पहिल्यांदा डिसेंबर २०१४ साली माझ्याकडे आला होता. त्यावेळी भाजपच सरकार आले होते आणि आमचा पराभव झाला होता. मूळ कल्पना ही होती की तिन्ही पक्षांनी एकत्र यायचं का? त्यानंतर इतर गोष्टी ठरल्या असत्या. पण त्यानंतर २०१९ साली मीच तो प्रस्ताव पुढे नेला. २०१९ साली जर मुख्यमंत्री पुन्हा देवेंद्र फडणवीस झाले तर आपले काही खरं नाही असे सुद्धा मला वाटले होते. (Prithviraj Chavan Shiv Sena Alliance)
यावर मात्र काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी वेगळीच प्रतिक्रिया दिली असून,' ज्या गोष्टीबाबत मला माहित नाही त्या गोष्टीबाबत मी काहीच बोलणार नाही.'असे वडेट्टीवार म्हणाले आहेत.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे आमदार प्रवीण दरेकर म्हणाले की,"काँग्रेसमध्ये अंतर्गत नेतृत्वाची लढाई दिसत असून, पृथ्वीराज चव्हाण यांनी एक गोष्ट मान्य केली आहे की भाजप इतका मजबूत होत आहे की शिवसेनेला सोबत घेतल्याशिवाय आपले काही खर नाही. पण यातून त्यांनी काँग्रेस सोबत शिवसेनेची देखील वाट लावली आहे." (Prithviraj Chavan Shiv Sena Alliance)
उद्योग मंत्री उदय सामंत पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्यावर बोलताना म्हणाले की,"२०१४ नंतर बारा वर्षांनी पृथ्वीराज चव्हाण यांनी हा दावा केला तो यापूर्वी का केला नाही. या गोष्टीत काहीही तथ्य नसून २०१९ सालच्या महाविकास आघाडी सरकार स्थापनेस ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी की माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढाकार घेतला हे त्यांनाच माहिती." (Prithviraj Chavan Shiv Sena Alliance)
दुसरीकडे मात्र राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्यात सुद्धा टीका प्रतीटीका पहायला मिळत आहे. तर पृथ्वीराज चव्हाण सातत्याने वेगवेगळे दावे करत आहेत. (Prithviraj Chavan Shiv Sena Alliance)