डोंबिवलीत साहित्यप्रेमींची गर्दी! ‘गावगाडा’ कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न

    22-Aug-2026   


डोंबिवली :
(Maharashtra Literature) ग्रामीण प्रथा व शहरी वाटा यांवर आधारित ‘गावगाडा’ या कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा आशिष जननी हॉल, डोंबिवली जिमखान्यासमोर बी. बी. पाटील महिंदकर यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.

पाटण तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या महिंद गावातील रहिवासी बी. बी. पाटील महिंदकर यांनी ‘गावगाडा’ या कथासंग्रहाचे लेखन केले आहे. ग्रामीण जीवन, प्रथा-परंपरा, अनुभव आणि बदलत्या सामाजिक वास्तवाचे दर्शन घडविणाऱ्या या कथासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यास अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. (Maharashtra Literature)

या प्रसंगी शिवशंभो विचारमंच, कोकण प्रांताचे माननीय अभय राजे जगताप, डोंबिवली पूर्व येथील नगरसेविका रवीना माळी, नवी मुंबई विभाग क्रमांक १२ चे नगरसेवक डी. आर. पाटील, अधिकराव साळुंखे, दिनकर आवजी साळुंखे, तसेच पुस्तकाचे संपादक व मुद्रक सचिन पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते. (Maharashtra Literature)

अभय राजे जगताप यांनी आपल्या मनोगतात वाचन संस्कृती टिकविण्याचे महत्त्व अधोरेखित केले. वाचनातूनच नवीन पिढीला संस्कार मिळतात, असे त्यांनी सांगितले. लेखक बी. बी. पाटील महिंदकर यांनी यापुढेही असेच दर्जेदार लेखन करत राहावे आणि पुढील वेळी त्यांच्या कादंबरीच्या प्रकाशनासाठी आपल्याला पुन्हा बोलवावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. लेखक गावातील असो वा शहरातील, सूक्ष्म निरीक्षण आणि जीवनातील अनुभवांशिवाय उत्तम लेखन शक्य होत नाही, असेही त्यांनी नमूद केले. (Maharashtra Literature)

यावेळी रवीना माळी, नगरसेवक डी. आर. पाटील, दिनकरराव साळुंखे, अधिकराव साळुंखे यांनीही मनोगत व्यक्त केले. पुस्तकाचे प्रकाशक व मुद्रक सचिन पाटील यांनी आपल्या ओघवत्या वाणीने श्रोत्यांना वाचनाची गोडी निर्माण करण्याचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार श्री. प्रशांत पाटील यांनी मानले. (Maharashtra Literature)








योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर