"युक्तीवाद झाला म्हणजे कोर्टाचा निर्णय झाला असे नव्हे" - विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

    22-Aug-2026   

Rahul Narwekar Shiv Sena Case 
 
मुंबई (Rahul Narwekar Shiv Sena Case) : जे लोक माझ्या किंवा निवडणूक आयोगाच्या निर्णयाशी सहमत नव्हते त्यांनी याचिका दाखल केली असेल तर, त्यासंदर्भात युक्तीवाद करणे हा त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे युक्तीवाद झाला म्हणजे कोर्टाचा निर्णय झाला असे नव्हे. त्यांनी त्यांचा युक्तीवाद केला आहे. दुसरी बाजू त्यांचा युक्तीवाद करतील. सगळी परिस्थिती आणि तथ्य्यांचा दखल घेता सर्वोच्च न्यायालय योग्य तो निर्णय देईल, अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या सुनावणीवर दिली.
 
माध्यमांशी बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले की, "मी दिलेला निर्णय हा अत्यंत शाश्वत, कायद्याच्या चौकटीत राहून आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकषांच्या अनुषंगाने दिलेला निर्णय आहे. त्यामुळे जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय यावर अंतिम निर्णय देत नाही तोवर त्यावर कोणतेही भाष्य करणे शोभणारे नाही. विधिमंडळ सचिवालयाने जे कार्य केले ती सर्व माहिती न्यायालयाकडे आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात यावर योग्यरित्या निर्णय होईल, अशी मला खात्री आहे." (Rahul Narwekar Shiv Sena Case)
 
ते पुढे म्हणाले की, "विरोध प्रदर्शन करणे हा लोकशाहीत प्रत्येकाचा अधिकार आहे. पण जो व्यक्ती लोकशाहीवर विश्वास ठेवतो तो कधीही असंविधानिकरित्या आपल्या विरोधाचे प्रदर्शन करत नाही. विरोधाच्या नावावर जर हिंसाचार किंवा अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत असल्यास त्यावर कारवाई करण्याची प्रशासनाची जबाबदारी आहे." (Rahul Narwekar Shiv Sena Case)
 
काही नेत्यांची भूमिका संधीसाधू
 
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्यावर बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले की, "राहुल गांधींना खरंच देशातील युवा पीढीबद्दल आणि त्यांच्या समस्यांबद्दल आपुलकी किंवा चिंता असती तर, याआधी इतकी वर्षे त्यांनी कधीही आवाज उचललेला दिसत नाही. त्यामुळे काही नेत्यांकडून संधीसाधूपणाची भूमिका दिसून येते," अशी टीकाही त्यांनी केली. (Rahul Narwekar Shiv Sena Case)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर