‘छात्रों की गूंज’ नव्हे तर ‘पैसों की गूंज’ राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी हजारों रुपयांचे आमिष - नवनाथ बन

    22-Aug-2026   

 Rahul Gandhi Pune Event 
 
मुंबई (Rahul Gandhi Pune Event) : राहुल गांधी यांच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या क्लिप आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर प्रसारित करण्यासाठी तीन ते साडेतीन हजार इन्फ्लुएन्सर्सना प्रत्येकी ३० ते ३५ हजार रुपये वाटप करण्यात येत असल्याने हा कार्यक्रम म्हणजे ‘छात्रों की गूंज’ नाही, तर ‘पैसों की गूंज’ असल्याचा आरोप भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला. त्यांनी पैशांचे आमिष दाखवणाऱ्या शंतनू या मध्यस्थाचे व्हिडीओ पत्रकार परिषदेत दाखवत या प्रकरणाची पोलखोल केली. तसेच या प्रकरणाची केंद्र सरकारने सखोल चौकशी करण्याची मागणीही केली. (Rahul Gandhi Pune Event)
 
नवनाथ बन म्हणाले की, "हा फक्त आमिष दाखवण्याचा प्रकार नसून प्रसिद्धी मिळवण्यासाठी राहुल गांधींचा हा कार्यक्रम आहे. आजपर्यंत आपण पीपीपी मॉडेलमध्ये पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप ऐकले होते. पण काँग्रेसचे पीपीपी मॉडेल म्हणजे राहुल गांधी यांचे रीलॉन्चिंग करणारा ‘पेड पॉलिटिकल प्रोग्राम’ आहे. या कार्यक्रमासाठी लोकांना प्रत्येकी ३० ते ३५ हजार रुपये अशा पद्धतीने जवळपास ९ ते १० कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. एका कार्यक्रमासाठी दहा-दहा कोटी रुपये खर्च केले जात असतील, तर 'छात्रों की गूंज' या संपूर्ण कार्यक्रमाचा खर्च जवळपास ५० ते १०० कोटी रुपये असण्याची शक्यता आहे. अशा अनेक कार्यक्रमांद्वारे राहुल गांधींचे रीलाँचिंग करण्यासाठी एकूण किती हजार कोटी रुपयांचे बजेट आहे, याचे उत्तर राहुल गांधी किंवा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी द्यावे." (Rahul Gandhi Pune Event)
 

काँग्रेसकडे निधी कसा आला?
 
"या कार्यक्रमासाठी इन्फ्लुएन्सर्सना फोन करणाऱ्या काँग्रेसशी संबंधित शंतनू नावाच्या मध्यस्थाचे ट्विटर हँडल तपासले असता त्यावर ‘मी नेहरूवादी आहे, गांधीवादी आहे आणि राहुल गांधींचा फॉलोवर आहे’, असे प्रोफाइल आहे. त्यात राहुल गांधी, नेहरू आणि काँग्रेस असा स्पष्ट उल्लेखही असल्याने स्पष्टपणे ते काँग्रेसच्याच व्यक्तीचे आणि तो नंबरही त्याचाच असल्याचे स्पष्ट होते. हा निधी काँग्रेसकडे कसा आला? हा काळा पैसा आहे का? कंत्राटदारांकडून आलेला आहे का? याची संपूर्ण चौकशी मोदी सरकारने करावी. याचा फॉरेन फंडिंगशी काही संबंध आहे का? याचाही तपास करण्यासाठी एसआयटी, सीबीआय चौकशी नेमावी. आतापर्यंत राहुल गांधींना ९९ वेळा रिलाँच करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, ९९ निवडणुकांमध्ये राहुल गांधी अपयशी झाले," अशी टीकाही त्यांनी केली. (Rahul Gandhi Pune Event)

हे तर काँग्रेसच्या पळपुटेपणाचे लक्षण
 
"वंदे मातरमला विरोध करत दोनच कडवी गायली गाणार, असे म्हणणाऱ्या राहुल गांधींना विरोध करण्यासाठी आज पुणे विद्यापीठात हजारोंच्या संख्येने तरुणाई काँग्रेसच्या कानठळ्या बसतील अशा पद्धतीने सामूहिकरित्या संपूर्ण वंदे मातरम गाणार असल्याने काँग्रेसची पळता भुई थोडी झाली आहे. विजय वडेट्टीवार विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांसमोर जाऊन दमदाटी करतात, हे काँग्रेसच्या पळपुटेपणा आणि घाबरटपणाचे लक्षण आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राज्याचे मंत्री राहिलेल्या विजय वडेट्टीवार विद्यार्थ्यांमध्ये जाऊन गुंडागिरी करण्याचा प्रयत्न करणार असतील तर त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल," असेही ते म्हणाले. (Rahul Gandhi Pune Event)





अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर