राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज' कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी इन्फ्लुएन्सर्सना २५,००० रुपयांचे आमिष! व्हिडिओ व्हायरल...


पुणे: (Rahul Gandhi Pune Visit) काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या शनिवारी २२ ऑगस्ट रोजी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या 'छात्रों की गूंज' या कार्यक्रमावरून नवीन राजकीय वाद पेटला आहे. या कार्यक्रमाचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना थेट २५,००० रुपये दिले जात असल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. या मोठ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी आयोजकांना कायदा-सुव्यवस्था आणि सुरक्षेच्या दृष्टीने कडक अटी व शर्ती लागू केल्या आहेत. (Rahul Gandhi Pune Visit)

सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओमध्ये शंतनू नावाचा एक व्यक्ती एका महिला इन्फ्लुएन्सरशी बोलताना दिसत आहे. कार्यक्रमातील गर्दी, राहुल गांधींच्या भाषणाचे अंश आणि उपस्थित विद्यार्थ्यांच्या मुलाखतींचे २-३ व्हिडिओ बनवून स्वतःच्या अकाऊंटवरून पोस्ट करण्यासाठी २५,००० रुपये दिले जातील, असे तो या संभाषणात सांगत आहे. (Rahul Gandhi Pune Visit)

पुण्यातील आरटीओ चौकाजवळील एसएसपीएमएस कॉलेजच्या मैदानावर सायंकाळी ४:३० ते रात्री ९:३० या वेळेत हा कार्यक्रम होणार असून, येथे ८,००० ते १०,००० नागरिक/विद्यार्थी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडक निर्देश दिले आहेत. महिला सुरक्षारक्षक, खाजगी सुरक्षा कर्मचारी आणि स्वयंसेवकांची नियुक्ती करणे आयोजकांना बंधनकारक आहे. संपूर्ण मैदानावर चोवीस तास सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत राहावेत. (Rahul Gandhi Pune Visit)

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, ध्वनी प्रदूषण नियम २००० आणि पर्यावरण अधिनियम १९८६ चे तंतोतंत पालन करावे लागेल. कार्यक्रमस्थळी छायाचित्रणासाठी ड्रोनच्या वापरावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. पोलीस, रुग्णवाहिका आणि अग्निशामक दलासाठी आपत्कालीन प्रवेशमार्ग खुला ठेवावा लागेल. तसेच पुरेसे पिण्याचे पाणी, स्वतंत्र शौचालये, पुरुष-महिलांसाठी स्वतंत्र येण्या-जाण्याचे मार्ग आणि पार्किंगची सोय करणे आवश्यक आहे. कोणतीही आक्षेपार्ह चित्रे, बॅनर किंवा अनुचित घटना घडल्यास त्यातून निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीला आयोजक जबाबदार असतील. (Rahul Gandhi Pune Visit)




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर