मुंबई : (National Overseas Scholarship) जागतिक दर्जाच्या नामांकित परदेशी विद्यापीठांमध्ये मास्टर पदवी किंवा पीएच.डी. करण्याचे स्वप्न पाहणार्या अनुसूचित जातीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी अत्यंत सुवर्णसंधी आहे. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने ’नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप’ योजनेअंतर्गत रिक्त राहिलेल्या जागा भरण्यासाठी नवीन ऑनलाईन अर्ज प्रक्रिया अधिकृतपणे सुरू केली आहे. पात्र आणि इच्छुक विद्यार्थ्यांनी केंद्रीय मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तातडीने आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाजकल्याण विभागाकडून करण्यात आले आहे. (National Overseas Scholarship)
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी यापूर्वी एप्रिल ते जून २०२६ दरम्यान पहिल्या टप्प्यातील अर्ज मागवण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही काही जागा रिक्त राहिल्याने केंद्र सरकारने विशेष पावले उचलत ऑगस्टच्या तिसर्या आठवड्यापासून हे राष्ट्रीय पोर्टल पुन्हा एकदा खुले केले आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी देशभरातून एकूण १२५ गुणवंत विद्यार्थ्यांची निवड केली जाते. यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी ११५ जागा, डी-नोटिफाइड, भटक्या व विमुक्त जमातींसाठी ६ जागा, तर भूमिहीन शेतमजूर आणि पारंपरिक कारागीर घटकांसाठी ४ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तसेच, एकूण जागांपैकी ३० टक्के जागा या विद्यार्थिनींसाठी राखीव आहेत.परदेशातील शिक्षणाचा संपूर्ण खर्च सरकार उचलणारया अत्यंत महत्त्वाकांक्षी शिष्यवृत्ती योजनेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा परदेशातील सर्व शैक्षणिक खर्च केंद्र सरकारतर्फे थेट केला जातो. (National Overseas Scholarship)
यामध्ये पुढील घटकांचा समावेश आहे:
१. शिक्षण शुल्क: संबंधित परदेशी विद्यापीठाचे संपूर्ण वार्षिक शिक्षण शुल्क.
२. निर्वाह भत्ता: अमेरिकेत शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना वार्षिक १५,४०० डॉलर्स (अंदाजे १२ लाख रुपयांपेक्षा जास्त), तर ब्रिटनमध्ये शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना वार्षिक ९,९०० पौंड इतका भत्ता दिला जातो.
३. इतर सोयी-सुविधा: विमान प्रवासाचे येण्या-जाण्याचे तिकीट , पुस्तकांचा खर्च, स्थानिक प्रवासाचा भत्ता आणि वैद्यकीय विमा खर्च देखील सरकार स्वतः उचलते.(National Overseas Scholarship)
अर्ज करण्यासाठी पात्रता आणि अटी
शैक्षणिक पात्रता: मास्टर पदवीसाठी अर्ज करणार्या विद्यार्थ्यांकडे किमान ६०% गुणांसह संबंधित विषयातील पदवी असावी. तर पीएच.डी.साठी मागील पदव्युत्तर पदवीत ६०% गुण असणे आवश्यक आहे.
कौटुंबिक उत्पन्न मर्यादा: अर्जदार विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा कमी असणे बंधनकारक आहे.
वयोमर्यादा: अर्ज सबमिट करण्याच्या वर्षात विद्यार्थ्यांचे वय ३५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
विद्यापीठांचे रँकिंग: विद्यार्थ्याने केवळ परदेशातील ’टड वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग’मध्ये पहिल्या ५०० मध्ये असणार्या विद्यापीठांमध्येच प्रवेश घेतलेला असावा.
अर्ज कसा आणि कुठे करावा?
इच्छुक विद्यार्थ्यांनी कोणत्याही मध्यस्थाचा आधार न घेता थेट केंद्र सरकारच्या पेीाीक्षश.र्सेीं.ळप या अधिकृत राष्ट्रीय पोर्टलवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करायची आहे. या सध्या सुरू असलेल्या फेरीसाठी जागा मर्यादित असल्याने, पोर्टलवर अर्ज प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जात आहे. अर्जासोबत जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, परदेशी विद्यापीठाचे अधिकृत ऑफर लेटर आणि शैक्षणिक कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे. तांत्रिक चुका टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावरील मार्गदर्शक तत्त्वांचे काळजीपूर्वक वाचन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (National Overseas Scholarship)
एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.