वांद्र्यातील डिजिटल जाहिरात फलकांची चौकशी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश;७ दिवसांत बैठक घ्या

    21-Aug-2026   
Inquiry into digital billboards in Bandra
 
मुंबई : (Inquiry Into Digital Billboards In Bandra) वांद्रे पूर्व येथील टीचर्स कॉलनी, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील एमएसआरडीसीच्या फुट ओव्हर ब्रिजवरील डिजिटल एलईडी जाहिरात फलकांची परवानगी, वैधता आणि सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने सखोल चौकशी करावी, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.
 
विधानभवन येथे अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस मुंबई महानगरपालिका, एमएसआरडीसी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या फलकांवरील सतत बदलणाऱ्या जाहिराती व व्हिडीओंमुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होऊन अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता बैठकीत व्यक्त करण्यात आली.(Inquiry Into Digital Billboards In Bandra)
 
जाहिरात फलकांच्या परवानगी प्रक्रियेतील कागदपत्रे, निविदा प्रक्रिया तसेच माहिती अधिकारांतर्गत मागविलेली संपूर्ण माहिती उपलब्ध नसल्याची बाबही बैठकीत मांडण्यात आली. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेची तपासणी करून आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.(Inquiry Into Digital Billboards In Bandra)
 
सात दिवसांत बैठक घ्या
 
एमएसआरडीसीने सात दिवसांत संबंधित विभागांची बैठक घ्यावी. या बैठकीस वाहतूक पोलिसांच्या अधिकाऱ्यांना उपस्थित करून फलकांची वैधता, परवानगी प्रक्रिया आणि वाहतूक सुरक्षेचा आढावा घ्यावा. तसेच सविस्तर अहवाल सादर करावा, असे अण्णा बनसोडे यांनी स्पष्ट केले. अनियमितता किंवा गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.(Inquiry Into Digital Billboards In Bandra)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर