‘चिकन नेक’वर अमित शाहांचा मास्टरप्लॅन! SSB जवानांना दिले आधुनिक तंत्रज्ञानाचे बळ

 
Amit Shah Siliguri Corridor
 
सिलीगुडी (Amit Shah Siliguri Corridor) : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवार दि. २१ ऑगस्ट रोजी पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे सशस्त्र सीमा बल (SSB)च्या जवानांशी संवाद साधत सीमा सुरक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सीमेवर सुरक्षा व्यवस्था सांभाळणाऱ्या SSB जवानांच्या कार्याचे कौतुक केले. सिलीगुडीचा परिसर भारताच्या ईशान्य भागासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. (Amit Shah Siliguri Corridor)
 
अमित शाह यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले की, मैत्रीपूर्ण देशांसोबत सांस्कृतिक समन्वय कायम ठेवत SSB जवानांनी खुल्या सीमेचे अत्यंत सतर्कतेने आणि प्रभावीपणे संरक्षण केले आहे. त्यांच्या या कार्याची प्रशंसा करताना त्यांनी सीमा सुरक्षेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अधिक मजबूत करण्यावर भर दिला. (Amit Shah Siliguri Corridor)
 
सीमा सुरक्षेसाठी ड्रोन आणि अँटी-ड्रोन प्रणाली, थर्मल इमेजिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित निगराणी, स्मार्ट सर्व्हेलन्स ग्रिड आणि रिअल-टाइम इंटेलिजन्स शेअरिंग यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याचे शाह यांनी सांगितले. या तंत्रज्ञानामुळे सीमावर्ती भागातील हालचालींवर अधिक प्रभावीपणे लक्ष ठेवणे आणि संभाव्य धोके वेळीच ओळखणे शक्य होणार आहे. (Amit Shah Siliguri Corridor)
 
यापूर्वी जुलैमध्ये सिलीगुडीतील जुमागाछ सीमा चौकीला भेट देताना शाह यांनी अत्याधुनिक सीमा सुरक्षा प्रणालींची पाहणी केली होती. यामध्ये रेडिओ-आधारित फेन्स ब्रीच डिटेक्शन आणि इन्फ्रारेड अलार्म प्रणालींचाही समावेश होता. (Amit Shah Siliguri Corridor)
 
अमित शाह यांनी पुढे सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार भारताच्या सीमा अधिक सुरक्षित करण्यासाठी ‘स्मार्ट बॉर्डर’च्या संकल्पनेवर काम करत आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि विविध सुरक्षा यंत्रणांमधील समन्वयाच्या माध्यमातून देशाची सीमा सुरक्षा जागतिक दर्जाची करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सिलीगुडी दौऱ्यात शाह यांनी SSB च्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांशी संबंधित कार्यक्रमांनाही हजेरी लावली. (Amit Shah Siliguri Corridor)
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर