भावूक करणारा क्षण! देवाभाऊंनी बांधली प्रीती ताईच्या नव्या संसाराची गाठ; मंगलाष्टकांत डोळ्यांत आले आनंदाश्रू

    20-Aug-2026
 
Devendra Fadnavis Emotional Moment
 
मुंबई (Devendra Fadnavis Emotional Moment) : मंगलाष्टके सुरू होतं आणि अलगद तिच्या डोळ्यात अश्रू आले. पण आज ते अश्रू दुःखाचे नव्हते ते आनंदाचे समाधानाचे अश्रू होते. कारण काही वर्षांपूर्वी याच ताईला वाटलं होतं, आपलं आयुष्य आता संपलं. कोरोना काळात आपल्या पतीला गमावल्यानंतर पुढचं आयुष्य कसं जगायचं, हा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला होता. संसार नुकताच सुरू झाला होता आणि एवढ्या कमी वयात तिच्या वाट्याला वैधव्याचं दुःख आलं होतं.
 
पण त्याच वेळी तिच्या आयुष्यात दोन भाऊ आले, तेव्हाचे विरोधी पक्षनेते आणि आताचे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी आमदार संदीप जोशी. (Devendra Fadnavis Emotional Moment)
 
तुम्हाला माहिती आहे का?
 
कोरोना काळात नागपूर मधील १९ ते २५ वयोगटातील जवळपास २९३ मुलींनी आपल्या पतीला गमावलं होतं. एवढ्या कमी वयात या मुलींच्या आयुष्यात आलेलं हे दुःख खरंच मोठं होतं. पण ही गोष्ट देवाभाऊंना पाहवली नाही. या मुलींच्या आयुष्याची जबाबदारी स्वीकारण्याचा निर्णय घेतला गेला. देवाभाऊंनी १०० परिवारांचं पालकत्व स्वीकारलं आणि माजी आमदार संदीप जोशी यांनीही बाकीच्या परिवारांची जबाबदारी घेतली. (Devendra Fadnavis Emotional Moment)
 
तेव्हापासून आजपर्यंत त्यांच्या शिक्षणाचा, त्यांच्या गरजांचा आणि त्यांच्या भविष्यासाठी लागणाऱ्या गोष्टींचा खर्च उचलला गेला.
हे तुम्हालाही माहिती नव्हतं ना? कारण त्या गोष्टीचा कुठेही गाजावाजा केला नाही, कुठे स्वतःच्या कामाच्या जाहिराती नाहीत, पण जबाबदारी मात्र शेवटपर्यंत निभावली.
 
आणि आज त्या जबाबदारीचा एक अतिशय भावनिक क्षण प्रीती ताईच्या आयुष्यात आला होता. (Devendra Fadnavis Emotional Moment)

आज त्यांचा पुनर्विवाह होता.
 
प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला लग्नाचा दिवस हा भावनिक असतो. पण प्रीती ताईसाठी आजचा दिवस आणखी वेगळा होता. कारण ज्या आयुष्यात एकदा सगळं संपल्यासारखं वाटलं होतं, त्याच आयुष्यात आज पुन्हा नव्या संसाराची सुरुवात होत होती. आणि त्या सुरुवातीच्या वेळी तिच्या पाठीशी उभे असलेले तिचे दोन्ही भाऊ आजही तिच्यासोबत होते. (Devendra Fadnavis Emotional Moment)
 
मंगलाष्टके सुरू झालं समोरून अक्षता तिच्या अंगावर आल्या आणि नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू आले.
 
आणि मग तो क्षण आला
 
देवाभाऊंनी स्वतः प्रीती ताईच्या पदराची गाठ शिवम यांच्या सोबत बांधली. तिचा हात शिवम यांच्या हातात दिला आणि तिच्या आयुष्याची ही नवी, सुखद गाठ बांधून दिली. काही वर्षांपूर्वी ज्या ताईच्या आयुष्यात संसाराची गाठ अचानक सुटली होती, आज त्याच ताईच्या नव्या संसाराची गाठ तिचा भाऊ स्वतः बांधत होता. तो क्षण शब्दांत सांगण्यापेक्षा अनुभवण्याचा होता. (Devendra Fadnavis Emotional Moment)
 
देवाभाऊंच्या हातून तिच्या पदराची गाठ बांधली जात होती. समोर तिचं नवं आयुष्य उभं होतं आणि डोळ्यांत आलेले ते अश्रू पाहताना तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचं मन भरून आलं असेल.
 
देवाभाऊंनी यापूर्वीही अनेक निर्णय घेतले आहेत, ज्यातून मुख्यमंत्र्यांमधला संवेदनशील माणूस आपल्याला वारंवार दिसला. अनाथ मुलांसाठी एक टक्का आरक्षण देण्याचा निर्णय असो, महिलांसाठी लाडकी बहीणपासून लखपती दीदीपर्यंतच्या योजना असोत, अपंगांसाठीच्या विविध योजना असोत. प्रत्येक वेळी समाजातील एखाद्या घटकाच्या आयुष्याला आधार देण्याचा प्रयत्न त्यांच्या निर्णयातून दिसला. (Devendra Fadnavis Emotional Moment)
 
पण या पलीकडेही काही गोष्टी असतात ज्या आपल्याला माहीतही नसतात. प्रीती ताईसारख्या १०० परिवारांचं पालकत्व देवाभाऊंनी स्वीकारलं आहे, हे त्यांनी कधी स्वतः सांगत फिरलं नाही,सोशल मीडियावर त्याची पोस्ट केली नाही. मुलाखतीमध्ये सांगून स्वतःचं कौतुक करून घेतलं नाही. पण जेव्हा कर्तव्य करण्याची वेळ आली, तेव्हा हा भाऊ सगळ्यात पुढे उभा राहिला.
 
मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून अनेकांना मरणाच्या दारातून परत आणताना आपण त्यांना पाहिलं आहे. महाराष्ट्रातली असो किंवा महाराष्ट्राबाहेरही एखाद्या बहिणीवर संकट आलं आणि मदतीची गरज पडली, तर रात्रीची वेळ असो किंवा कितीही मोठी अडचण असो, त्या बहिणीसाठी उभा राहणारा संवेदनशील भाऊ आपण पाहिला आहे. आणि आज पुन्हा एकदा तोच भाऊ आपल्या बहिणीच्या लग्नात तिच्या पाठीशी भक्कमपणे उभा होता. (Devendra Fadnavis Emotional Moment)
 
लग्न लागल्यानंतर प्रीती ताईंनी जेव्हा आपल्या भावना सांगितल्या, तेव्हाही त्यांच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. आपल्या या दोन भावांबद्दल बोलताना त्यांचा कंठ दाटून आला. आणि आज आपल्या आयुष्याला जी नवी सुरुवात मिळाली आहे, त्याचं श्रेय त्या देवाभाऊंना देत होत्या. खरं तर आज देवाभाऊंना देण्यासाठी धन्यवाद हा शब्दही कमी वाटतो. कारण त्यांनी हे काही प्रसिद्धीसाठी केलं नाही. हा त्यांचा स्वभाव आहे. आणि हा स्वभाव त्यांच्यावर घडलेल्या संस्कारातूनच आला आहे, हे त्यांच्या प्रत्येक निर्णयातून जाणवतं.
 
मुख्यमंत्री म्हणून त्यांचं काम आपण पाहतोच पण मुख्यमंत्र्यांच्या पलीकडे जाऊन, एखाद्या बहिणीच्या अडचणीच्या वेळी तिच्या पाठीशी उभा राहणारा भाऊ म्हणूनही आपण त्यांना वेळोवेळी पाहिलं आहे. आजचा हा प्रसंग मात्र खरंच मनाला चटका लावून गेला हा क्षण कदाचित प्रीती ताई आयुष्यभर विसरणार नाहीत. (Devendra Fadnavis Emotional Moment)
 
मंगलाष्टके सुरू असताना डोळ्यात आलेले अश्रू, समोर उभा असलेला शिवम, आणि त्या सगळ्या सोहळ्यात तिच्या भावासारखा खंबीरपणे उभा असलेला देवाभाऊ. काही वर्षांपूर्वी ज्या दुःखाने तिचं आयुष्य बदलून टाकलं होतं, त्याच आयुष्याला आज पुन्हा एक सुंदर वळण मिळालं. (Devendra Fadnavis Emotional Moment)
 
लग्न लागलं, प्रीती ताई नव्या संसाराला लागल्या आणि देवाभाऊंच्या चेहऱ्यावरही समाधान दिसत होतं, पण अजूनही अशी अनेक कुटुंबं आहेत, ज्यांच्यासाठी ही जबाबदारी सुरू आहे. अजून अनेक बहिणींच्या आयुष्यात असेच आनंदाचे क्षण यायचे आहेत. आणि ते ही लवकरच येतील.
 
प्रीती ताईला तिच्या नव्या आयुष्यासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि तिच्या दुःखाच्या काळात हात धरून, आज तिच्या सुखाच्या क्षणी तिच्या पदराची गाठ बांधून देणाऱ्या आपल्या देवाभाऊंना मनापासून आभार. (Devendra Fadnavis Emotional Moment)




संबंधित मजकूर