BWF World Championships 2026: तिसरा दिवस भारतासाठी चढ-उताराचा! पी. व्ही. सिंधू आणि आयुष शेट्टीचा दणदणीत विजय; लक्ष्य सेन, उन्नती हुड्डाच्या पदरी निराशा

 
BWF World Championships 2026 India
नवी दिल्ली (BWF World Championships 2026 India) : राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या BWF World Championships 2026 मध्ये दि. १९ ऑगस्ट रोजी स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी भारतासाठी संमिश्र निकाल पाहायला मिळाले. काही भारतीय खेळाडूंनी शानदार विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला, तर लक्ष्य सेन आणि युवा खेळाडू उन्नती हुड्डा यांचे स्पर्धेतील आपला प्रवास इथेच थांबवावा लागला.
 
पी. व्ही. सिंधूची दमदार आगेकूच
 
दोन वेळची ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधूने कॅनडाच्या वेन यू झांगचा २१-१६, २१-१७ असा पराभव केला. अवघ्या ३५ मिनिटांत सामना जिंकत सिंधूने महिला एकेरीच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. (BWF World Championships 2026 India)
 

आयुष शेट्टीचा आणखी एक शानदार विजय
 
जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू शि यूकीला पहिल्या फेरीत पराभूत करून खळबळ उडवणाऱ्या आयुष शेट्टीने दुसऱ्या फेरीत श्रीलंकेच्या दुमिंदू अबेविक्रमा याचा २१-०८, २१-१० असा पराभव केला. अवघ्या २६मिनिटांत विजय मिळवत आयुषने अंतिम १६ मध्ये स्थान मिळवले. (BWF World Championships 2026 India)
 
लक्ष्य सेन, उन्नती हुड्डाच्या पदरी निराशा
 
भारतासाठी दिवसातील सर्वात मोठा धक्का लक्ष्य सेनच्या पराभवाचा ठरला. अमेरिकेच्या १८ वर्षीय गॅरेट टॅनने लक्ष्यचा १९-२१, २१-१९, २१-१७ असा तीन गेममध्ये पराभव केला. पहिला गेम जिंकल्यानंतरही लक्ष्यला सामना आपल्या बाजूने वळवता आला नाही. त्यामुळे त्याचे स्पर्धेतील आव्हान राउंड ऑफ ३२ मध्येच संपले. (BWF World Championships 2026 India)
 
 
 
अटीतटीच्या लढतीनंतर लक्ष्यने आपल्या कामगिरीबाबत निराशा व्यक्त केली. सामना अत्यंत कठीण असल्याचे सांगताना लक्ष्य सेन म्हणाला, “हा खूप कठीण सामना होता. मी माझे सर्वस्व पणाला लावले. तिसऱ्या गेमच्या अखेरीस मी शारीरिकदृष्ट्याही खूप थकलो होतो.” गॅरेट टॅनने संपूर्ण सामन्यात चांगला आणि ठोस खेळ केल्याचेही लक्ष्यने मान्य केले. (BWF World Championships 2026 India)
 
महिला एकेरीत युवा उन्नती हुड्डाला कॅनडाच्या १२ व्या मानांकित मिशेल लीविरुद्ध २१-११, ९-२१, २१-२३ असा पराभव पत्करावा लागला. पहिला गेम जिंकल्यानंतर उन्नतीने चांगली झुंज दिली; मात्र निर्णायक गेममध्ये तिला विजय मिळवता आला नाही. (BWF World Championships 2026 India)
 
एकूणच, तिसऱ्या दिवशी भारताच्या काही खेळाडूंनी पदकाच्या दिशेने पाऊल पुढे टाकले असले तरी लक्ष्य सेन आणि उन्नती हुड्डाच्या पराभवामुळे भारतीय चाहत्यांना निराशाही सहन करावी लागली. (BWF World Championships 2026 India)




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर