जिल्हास्तरावरील कंत्राटी मनुष्यबळाच्या मानधनासाठी आवश्यक निधीस मान्यता - पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

    20-Aug-2026

₹16 Crore Fund for Contract Staff In Maharastra
 
मुंबई (₹16 Crore Fund for Contract Staff In Maharastra ) : "जिल्हास्तरावरील कंत्राटी मनुष्यबळाच्या मानधनासाठी आवश्यक असलेल्या १६ कोटी रुपयांच्या निधीची मागणी मान्य झाली आहे.कंत्राटी मनुष्यबळाच्या मानधनासाठी १०० टक्के राज्यहिश्श्यातून निधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सन २०२६-२७ च्या खर्चाच्या पुरवणी मागण्या शासनास सादर करण्यात आल्या आहेत. तसेच चजल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) अंतर्गत कार्यरत कंत्राटी व बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांच्या समावेशनाचा प्रस्ताव मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे सादर करावा."असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. (₹16 Crore Fund for Contract Staff In Maharastra )
 
मंत्रालयात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयांमध्ये कार्यरत कंत्राटी व बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत गुरुवार दि.२० ऑगस्ट रोजी आयोजित बैठकीत मंत्री पाटील बोलत होते. या बैठकीस विभागाचे अपर मुख्य सचिव पराग जैन-नैनुटीया, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव अमगोथू श्रीरंगा नायक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे आयुक्त गजेंद्र बावने, मुख्य अभियंता तथा विशेष कार्य अधिकारी प्रशांत भामरे आदी उपस्थित होते. (₹16 Crore Fund for Contract Staff In Maharastra )
 
"स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) संदर्भात झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत मुख्य सचिवांनी दिलेल्या निर्देशांनुसार आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. कंत्राटी मनुष्यबळाची आवश्यकता निश्चित करण्यासाठी आढावा घेण्यात यावा. तसेच, मानधनासाठी आवश्यक अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याची केंद्र शासनाकडे विनंती करावी." असे निर्देशही मंत्री पाटील यांनी दिले. (₹16 Crore Fund for Contract Staff In Maharastra )
 
 




संबंधित मजकूर