मुंबई : (Abhijeet Deepke) कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांची परस्पर भेट घेणारे शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट आणि आ. बच्चू कडू यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फटकारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वातील कॉकरोच जनता पार्टीने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्ली येथे मोठे आंदोलन केले होते. त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामाही दिला. दरम्यान, यानंतर मंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिजीत दिपके यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली होती.
तर, अभिजीत दिपके हे त्यांच्या घरी पोहोचल्यावर आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. मात्र, या भेटीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज झाल्याचे समजते. अभिजीत दिपके यांना भेटण्यासाठी परस्पर का गेलात? महायुतीची भूमिका ठरली नसताना अभिजीत दिपके यांची भेट का घेतली? अशी विचारणा एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू आणि संजय शिरसाट यांना केल्याची माहिती आहे.(Abhijeet Deepke)
शिरसाट आणि कडूंच्या मनात काय? - दरेकर
याविषयी एका वृत्तवाहिनीशी बोलताना भाजप आ. प्रवीण दरेकर म्हणाले की, "विरोधी पक्षांनी या आंदोलनावरून भाजप-एनडीएचे सरकार बदनाम करण्याचा प्रयत्न केला. अशावेळी त्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्यांच्या घरी जाऊन याला पुष्टी देण्याचे काम सुरु आहे. बच्चू कडू आणि संजय शिरसाट यांच्या मनात नेमके काय आहे, याचे स्पष्टीकरण होणे गरजेचे आहे. महायुतीमध्ये वितृष्ट निर्माण होईल असे वागू नये."(Abhijeet Deepke)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....