
नवी दिल्ली: (Delhi Earthquake Today 2.9 Magnitude) देशाची राजधानी दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (NCR) रविवारी पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या माहितीनुसार, पहाटे सुमारे ४ वाजून १४ मिनिटांनी आलेल्या या भूकंपाची रिश्टर स्केलवर २.९ इतकी तीव्रता नोंदवण्यात आली. भूकंपाची तीव्रता कमी असल्याने व बहुतांश नागरिक गाढ झोपेत असल्याने मोठा घाबरगुंडीचा प्रकार घडला नाही. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही. (Delhi Earthquake Today 2.9 Magnitude)
उत्तर दिल्लीत भूकंपाचा केंद्रबिंदु
रविवारी पहाटे ४:१४:०१ वाजता हा भूकंप झाला. त्याचे केंद्र उत्तर दिल्लीत २८.७२१ अंश उत्तर अक्षांश आणि ७६.९५७ अंश पूर्व रेखांशावर होते. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून सुमारे ८ किलोमीटर खोलीवर होता. उथळ खोलीवर केंद्रबिंदू असल्याने कमी तीव्रता असूनही काही नागरिकांना हलके कंप जाणवले. भूकंपशास्त्रज्ञांच्या मते २.९ तीव्रतेचा भूकंप अत्यंत सौम्य असतो, त्यामुळे इमारतींचे नुकसान किंवा कोणतीही आपत्कालीन स्थिती निर्माण झालेली नाही. (Delhi Earthquake Today 2.9 Magnitude)
आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्येही भूकंपाचे धक्के
दिल्लीसोबतच देशाच्या ईशान्येकडील राज्यांमध्येही भूकंपाच्या हालचाली नोंदवल्या गेल्या. रविवारी सकाळी ५ वाजून ३८ मिनिटांनी अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या काही भागांत २.८ रिश्टर स्केल तीव्रतेचे सौम्य धक्के बसले. या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली अवघ्या ५ किलोमीटर खोलीवर होता. (Delhi Earthquake Today 2.9 Magnitude)
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन
याआधी २७ जून रोजी दिल्ली-एनसीआरमध्ये ६.२ रिश्टर स्केलचा मोठा धक्का जाणवला होता, ज्याचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमध्ये होता. मात्र, रविवारी झालेल्या भूकंपाची तीव्रता फारच कमी असल्याने नागरिकांनी भीती बाळगू नये, अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच भर द्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Delhi Earthquake Today 2.9 Magnitude)