वडार समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर पुण्यात दोन दिवसीय कार्यशाळा

    19-Aug-2026   
Vadar Community ST Reservation
 
 
मुंबई,(Vadar Community ST Reservation): वडार समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण, समाजाचा इतिहास, घटनात्मक अधिकार आणि आरक्षणासाठी उपलब्ध कायदेशीर मार्ग याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय वडार सेनेच्या वतीने दोन दिवसीय विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. २२ आणि २३ ऑगस्ट रोजी खराडी येथील बांधिलकी संस्था, समर्थनगर, लेन क्रमांक ४ येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे.(Vadar Community ST Reservation)
 
कार्यशाळेत वडार समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण का आवश्यक आहे, आरक्षणासाठी उपलब्ध घटनात्मक व कायदेशीर मार्ग, समाजाचा इतिहास, परंपरा आणि सामाजिक ओळख, तसेच घटनात्मक अधिकार याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासोबतच समाजाच्या एकजुटीसाठी पुढील दिशा आणि सामाजिक प्रश्नांवरही चर्चा होणार आहे.(Vadar Community ST Reservation)
 
वडार समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक भारत विटकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील इच्छुक कार्यकर्ते, युवक-युवती तसेच समाजबांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.(Vadar Community ST Reservation)
 
कार्यशाळेतील सहभागासाठी नाव आणि मोबाईल क्रमांक नोंदविणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी सचिन जाधव ७०६६८५०२२४ यांच्याशी संपर्क साधता येणार आहे.(Vadar Community ST Reservation)
 
 
 
 
 




सागर देवरे

सागर देवरे, सामाजिक न्याय प्रतिनिधी, दैनिक मुंबई तरुण भारत.
शिक्षण : बी.ए. एल.एल.बी. (अभ्यासक्रम सुरू).
सामाजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असून विविध सामाजिक, शैक्षणिक व अन्य चळवळींवर वृत्तांकनाचा अनुभव.
समुदायाधारित प्रश्नांवर सातत्याने अभ्यासपूर्ण लेखन.
सामाजिक न्याय, हिंदू बहुजन समाजाचे प्रश्न व विद्यार्थी चळवळींवर विशेष लेखन.
संबंधित मजकूर