ठाणे रिंग मेट्रो की रोलर कोस्टर?:-7.2 मीटरपासून +73 मीटरपर्यंतचा ‘रोलर कोस्टर’

DPR मधील उंची-उतारामुळे ₹12,200 कोटींच्या प्रकल्पावर ठाणेकरांच प्रश्नचिन्ह

    19-Aug-2026

Thane Ring Metro
 
 
ठाणे,(Thane Ring Metro):- ठाणे शहराच्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून चर्चेत असलेल्या 29 किमी लांबीच्या, 22 स्थानकांच्या आणि सुमारे ₹12,200 कोटी खर्चाच्या इंटिग्रल रिंग मेट्रो प्रकल्पाच्या Final DPR मधील आकडेवारी समोर आल्यानंतर या प्रकल्पाच्या अभियांत्रिकी आणि उपयुक्ततेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. WakeUpThanekar सह नागरिक संघटना या प्रकल्पाला विरोध करत आहेत.(Thane Ring Metro)
 
वेक अप ठाणेकर संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते दयानंद नेने यांनी DPR चा चिकित्सकपणे अभ्यास केला आहे. त्यानुसार या मेट्रोचा मार्ग समुद्रसपाटीपासून -7.2 मीटर ते +73 मीटर असा तब्बल 80 मीटरचा हा मार्ग "व्हर्टिकल रोलर कोस्टर" आहे की काय असा सवाल ठाणेकरांनी उपस्थित केला आहे.(Thane Ring Metro)
 
DPR मधील महत्वाचे मुद्दे
 
1. जमिनीखाली आणि जमिनीवर
- सर्वात खाली: न्यू ठाणे स्थानक - जमिनीपासून 14.5 मीटर खाली `-7.200 MSL`
ठाणे जंक्शन - जमिनीपासून 15.2 मीटर खाली `-6.400 MSL`
- सर्वात उंच: शिवाई नगर - जमिनीपासून 20.34 मीटर उंच `67.300 MSL`
शिवाई नगर ते नीलकंठ दरम्यान मार्ग 73 मीटर MSL पर्यंत जाणार
 
2. सर्वात धोकादायक उतार

शिवाजी चौकनंतर मेट्रो थेट जमिनीखाली जाणार आहे. अवघ्या 425 मीटरच्या अंतरात रेल पातळी +7.5 मीटर वरून -8 मीटर पर्यंत उतरणार आहे. म्हणजे 15.5 मीटरचा उतार. यासाठी DPR मध्ये 3.7% compensated gradient दिला आहे - जो संपूर्ण कॉरिडॉरमधील सर्वाधिक आहे. हा ramp खाडीलगतच्या शासकीय 4,900 चौ.मी. जागेत प्रस्तावित आहे.(Thane Ring Metro)
 
3. पुन्हा चढाई

न्यू ठाणे येथे -7.2 मीटर पर्यंत गेलेली मेट्रो मेंटल हॉस्पिटलजवळील नाल्यालगत पुन्हा वर येणार आहे. येथे -8 मीटर वरून +7.5 मीटर पर्यंत म्हणजे पुन्हा 15.5 मीटर चढाई करावी लागणार आहे. यासाठी 11,628 चौ.मी. कायमस्वरूपी जमीन लागणार आहे.(Thane Ring Metro)
 
4. इतर महत्वाची स्थानके
 
वॉटरफ्रंट - जमीन फक्त 1.465 मीटर MSL, पण मेट्रो 16 मीटर MSL वर
बाळकुम नाका - 17.13 मीटर उंच, येथे मेट्रो लाईन-5 सोबत क्रॉसिंग
डोंगरीपाडा - 16.48 मीटर उंच, लाईन-4 आणि घोडबंदर फ्लायओव्हरसोबत समन्वय आवश्यक
 
मेट्रो इतकी वर-खाली का?
 
DPR मध्ये 4 कारणे दिली आहेत -
1. ठाण्याची चढ-उतार असलेली नैसर्गिक भौगोलिक रचना
2. मेट्रो लाईन-4, लाईन-5 आणि फ्लायओव्हर्ससोबत क्रॉसिंग
3. HCMTR आणि DP रोडचा जास्तीत जास्त वापर
4. जमीन संपादन कमी ठेवणे
 
नागरिकांचा खरा सवाल
 
अभियांत्रिकी कारणे ठीक आहेत. पण ₹12,200 कोटींच्या या गुंतागुंतीच्या प्रकल्पातून ठाण्याच्या प्रत्यक्ष वाहतूक समस्येवर किती तोडगा निघणार? प्रत्येक उंच व्हायाडक्ट, स्पेशल स्पॅन, ramp आणि भूमिगत भागाचा खर्च हा केवळ बांधकामापुरता मर्यादित राहणार नाही. त्याचा परिणाम भविष्यातील देखभाल, ऑपरेशन आणि शहराच्या सौंदर्यावरही होणार आहे.(Thane Ring Metro)
त्यामुळे प्रश्न "मेट्रो हवी की नको हा नसून ठाण्याला नेमकी कोणती मेट्रो हवी, कुठे हवी आणि किती उंचीवर हवी हाच असल्याचं ठाणेकरांच म्हणणं आहे.(Thane Ring Metro)








संबंधित मजकूर