नवी दिल्ली (Dhruv Kapila Tanisha Crasto) : भारताच्या ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो या मिश्र दुहेरी जोडीने BWF बॅडमिंटन विश्व अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये शानदार विजय मिळवत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इंडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत भारतीय जोडीने मकाओच्या लिओंग इओक चोंग आणि एनग वेंग ची यांचा सरळ दोन गेममध्ये पराभव केला.
ध्रुव आणि तनिषा यांनी सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. पहिल्या गेममध्ये भारतीय जोडीने प्रतिस्पर्ध्यांवर दबाव कायम ठेवत २१-११ असा विजय मिळवला. दुसऱ्या गेममध्येही त्यांनी आपली लय कायम राखत पुन्हा २१-११ अशी बाजी मारली. त्यामुळे सामना भारताने २१-११, २१ -११ असा सहज जिंकला. (Dhruv Kapila Tanisha Crasto)
या विजयामुळे ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो यांनी स्पर्धेच्या प्री-क्वार्टरफायनलमध्ये स्थान निश्चित केले आहे. या जोडीला स्पर्धेत १५ वे मानांकन मिळाले आहे. घरच्या मैदानावर भारतीय प्रेक्षकांचा मोठा पाठिंबा त्यांना मिळत असून, पुढील फेरीतही दमदार कामगिरी करण्याची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. (Dhruv Kapila Tanisha Crasto)
या विजयामुळे भारतीय बॅडमिंटन चाहत्यांच्या आशा उंचावल्या असून, ध्रुव-तनिषा जोडीकडून विश्व अजिंक्यपद स्पर्धेत मोठ्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Dhruv Kapila Tanisha Crasto)