मुंबई (Chitra Wagh vs Vijay Wadettiwar) : मला वेडी, वेंधळी म्हणणारे तुम्ही किती वैचारिकदृष्ट्या कंगाल आहात. हे तुमच्या नीच भाषेतून महाराष्ट्राला दिसले. माझ्या नवऱ्याबद्दल भ्रष्टाचाराचे आरोप करताना तुमचा तोल पूर्णपणे गमावला आहे. ज्या न्यायालयावर देशाचा विश्वास आहे, त्या न्यायालयाने माझ्या पतीला निर्दोष मुक्त केली आहे, असे प्रत्युत्तर भाजप नेत्या आ. चित्रा वाघ यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना दिले.
स्वातंत्र्यदिनी ‘वंदे मातरम्’ सुरू असताना काँग्रेस नेते सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची सुरू असलेली कुजबुज ही केवळ राष्ट्रीय गीताचा नव्हे, तर देशाच्या भावनांचा अपमान आहे, असे सांगून चित्रा वाघ यांनी सोनिया गांधी यांना ‘राष्ट्रीय गीत’ हे पुस्तक पाठवून, देशभक्तीचा खरा अर्थ आणि ‘वंदे मातरम्’मागची राष्ट्रभावना समजून घेण्याचा संदेश दिला. त्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्यावर टीका केली होती. (Chitra Wagh vs Vijay Wadettiwar)
वंदे मातरम्'च्या सन्मानासाठी मी १०० वेळा वेडी व्हायला तयार आहे! राष्ट्रीयगानाचा अपमान सहन न झाल्याने सोनिया गांधींना पुस्तक पाठवले, तर विजय वड्डेट्टीवार माझ्यावर कौटुंबिक चिखलफेक करत आहेत. न्यायालयात निर्दोष सुटलेल्या विषयावर खोटे बोलून स्वतःचे वैचारिक दारिद्र्य दाखवू नका.… pic.twitter.com/Snma2xGPPo
या टीकेवर बोलताना आ. चित्रा वाघ म्हणाल्या की, “एका भारतीय स्त्रीने सोनिया गांधींना वंदे मातरमचे पुस्तक पाठवून राष्ट्रगानासाठी सन्मान राखायला सांगणे हा विजय वडेट्टीवार यांच्या दृष्टीने वेधळेपणा ठरतो का? वंदे मातरमचा अपमान सहन न होणे, जर वेडेपणा असेल तर होय मी या देशाच्या सन्मानासाठी १०० वेळा वेडी व्हायला तयार आहे. न्यायव्यवस्थेचा निर्णय मान्य करण्याची अक्कल तुमच्यात आहे का? की, सोनिया गांधींची चाटूगिरी करताना देशाच्या न्यायालयाचा विसर पडलाय. माझ्या नवऱ्याला न्यायालयाने निर्दोष ठरवले आहे. पण सोनिया गांधींच्या लाचारीत अडकलेल्या विजय वडेट्टीवार तुमच्या मानसिकतेला महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही.” (Chitra Wagh vs Vijay Wadettiwar)
तुमचे खोटे आरोप मला गप्प करु शकत नाही
“राष्ट्रगानाचा अपमान झाला म्हणून मी प्रश्न विचारला, तर तुम्ही माझ्यावर कुटुंबावर घसरलात. यावरुन सिद्ध होते की, वंदे मातरमचा आदर करण्याची दानत तुमच्यात नाही. विजय विजय वडेट्टीवार तुमची ही असभ्य भाषा, खोटे आरोप मला गप्प करु शकत नाही. सोनिया गांधी यांना वंदे मातरमचे पुस्तक पाठवले. आता तुम्हाला मी भारतीय संविधानाची आणि न्यायालयाच्या निर्णयाची प्रत पाठवते ती नीट वाचा आणि मगच बंद थोबाड उघडा,” अशा शब्दात चित्रा वाघ यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका केली. (Chitra Wagh vs Vijay Wadettiwar)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....