राज्याला वेठीस धरण्याची जरांगेंची भाषा चुकीची; आ. परिणय फुके; ही सर्वोच्च न्यायालयातील लढाई

    18-Aug-2026   
Parinay Phuke Manoj Jarange
 
नागपूर : (Parinay Phuke Manoj Jarange) कॉक्रोट जनता पार्टीचे दिल्लीतील आंदोलन पाहून मनोज जरांगे यांना हुरूप आलेला आहे, असे मला वाटते. या प्रकारची मागणी आणि कुठेतरी सरकारला आणि राज्याला वेठीस धरण्याची जरांगे यांची भाषा ही चुकीची आहे. आरक्षण संविधानाच्या चौकटीतच मिळते. अशा प्रकारे जोर जबरदस्ती करून आणि सरकार पलटून देण्याची भाषा तुम्ही अराजकता पसरवणार आहात का? असा सवाल आ. परिणय फुके यांनी केला आहे.
 
माध्यमांशी बोलताना आ. परिणय फुके म्हणाले की, “मनोज जरांगे यांनी अशा प्रकारची भाषा करू नये. जरांगे पाटील यांचे कथित सल्लागार त्यांना चुकीचे मार्गदर्शन करत असल्याचे मला वाटते. त्यांनी संविधान आणि आरक्षणाच्या संदर्भातील अभ्यास करावा. जात वैधता प्रमाणपत्र किंवा जात प्रमाणपत्र हे सर्वोच्च न्यायालयाने त्या त्या वेळी दिलेल्या निर्देशानुसारच दिले जातात. ही रस्त्यावरची लढाई नसून सर्वोच्च न्यायालयातील लढाई आहे. त्यामुळे त्यांनी चांगले वकील नेमावा आणि चांगला युक्तीवाद करून आपल्या समाजाला न्याय मिळवून द्यावा. जरांगे यांचे अनेक सल्लागार आहेत. त्यामुळे ते वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी भूमिका घेतात.”(Parinay Phuke Manoj Jarange)
 
ओबीसींचे आरक्षण धोक्यात नाही
 
ते पुढे म्हणाले की, “ओबीसींचे आरक्षण कुठेही धोक्यात नाही. कायद्याच्या आणि संविधानाच्या चौकटीत राहूनच आरक्षण दिले जाणार आहे. कोणत्याही आंदोलनामुळे कोणत्याही जातीला त्या यादीत समाविष्ट करता येत नाही. जरांगे पाटील ज्याप्रकारे ५८ लाख नोंदी झाल्या असे सांगतात त्यात आम्हीसुद्धा आहोत. ज्यात आधीपासून आमच्या पूर्वजांना ओबीसींचे प्रमाणपत्र मिळते त्याप्रमाणे ते प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. पण जे खरे कुणबी आहेत त्यांनाही मराठवाड्यात प्रमाणपत्र देण्यात आले आहेत.”(Parinay Phuke Manoj Jarange) 
 
आंदोलनासाठी जरांगेंचा पोलिसांकडे अर्ज
 
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलन करण्याच्या तयारीला सुरुवात केली असल्याचे समजते. या आंदोलनासाठी आझाद मैदान पोलिसांकडे अधिकृत परवानगीचा अर्ज करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.(Parinay Phuke Manoj Jarange)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर