‘मुंब्रादेवी कालही भगवा होता, आजही आहे आणि उद्याही राहील’-मंत्री नितेश मुंब्र्यात कडाडले...

    18-Aug-2026

Nitesh Rane Mumbra
 
 ठाणे,(Nitesh Rane Mumbra):- ठाण्यातील मुंब्रा परिसरात आयोजित भव्य कावड यात्रेच्या निमित्ताने मंत्री नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका मांडत मुंब्र्याच्या नामकरणावरून थेट आवाहन केले. “आजपासून कोणीही मुंब्रा बोलायचे नाही, मुंब्रादेवी बोलायचे. हा देश हिंदूराष्ट्र आहे, कोणाच्या अब्बाचा पाकिस्तान नाही,” असा घणाघाती इशारा राणे यांनी दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे मुंब्रा परिसरातील हिंदूंमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.(Nitesh Rane Mumbra)
 
मुबऱ्यातील शिवभक्तांनी आयोजित केलेल्या कावड यात्रेनिमित्त राणे मुंब्रा येथे आले होते त्या समयी त्यांनी मुंब्र्यातील जिहादी धर्मांध मुसलमानांवर जोरदार प्रहार केलं..ते म्हणाले, “बोलता बोलता आलो की नाही मुंब्र्यात. पण हे मुंब्रा नाही, तर हे मुंब्रादेवी आहे. आजपासून कोणीही मुंब्रा बोलायचे नाही, मुंब्रादेवी बोलायचे. हा देश हिंदूराष्ट्र आहे. कोणाच्या अब्बाचा पाकिस्तान नाही.”(Nitesh Rane Mumbra)
 
पुढे ते म्हणाले, “सगळ्या हिंदू बंधू-भगिनींना हे हिंदूराष्ट्र आहे, आहे, हे सांगतो. ही महादेवाची भूमी आहे. हे तुमचे शहर आहे. इथे कोणीही कोणाच्या भीतीने मुंब्रादेवीला सोडू नका.”(Nitesh Rane Mumbra)
 
‘देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने सांगण्यासाठी हा मंत्री आला आहे’
 
मुंब्रा परिसरातील हिंदू समाजाला घाबरण्याचे कारण नसल्याचे सांगत राणे यांनी पुढे म्हटले, “इथला जो हिंदू समाज आहे, त्याला घाबरण्याची गरज नाही. हिंदुत्व विचाराचे मुख्यमंत्री मंत्रालयात बसले आहेत. कोणीही तुमच्याकडे वाकड्या नजरेने बघणार नाही, हा विश्वास देतो.”(Nitesh Rane Mumbra)
 
‘घाबरवण्याचा प्रयत्न केला तर हा नितेश राणे एका तासात येईल’
 
यावेळी राणे यांनी थेट इशाराही दिला. “जो कोणी जिहादी इथल्या हिंदूंना घाबरवण्याचा प्रयत्न करेल, तर त्यांच्यासाठी हा नितेश राणे एक तासात इथे येईल,”(Nitesh Rane Mumbra)
 
तसेच मुंब्रा परिसरात हिंदू समाजाची ताकद वाढली पाहिजे, असे आवाहन करत त्यांनी भगव्या अस्मितेचा मुद्दा पुढे केला. “आपल्या मुंब्रादेवी परिसरात आपली हिंदू ताकद वाढली पाहिजे. हा मुंब्रादेवी परिसर कालही भगवा होता, आजही भगवा आहे आणि उद्याही भगवा राहील,” असे राणे यांनी ठणकावून सांगितले.(Nitesh Rane Mumbra)
 
काही दिवसांपूर्वीच नितेश राणे यांनी मुंब्र्याचे नामकरण ‘मुंबादेवी’ किंवा ‘मुंब्रादेवी’ करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता प्रत्यक्ष मुंब्रा परिसरातील कावड यात्रेत त्यांनी “मुंब्रा नव्हे, मुंब्रादेवी म्हणा” असे थेट आवाहन केल्याने मुंब्रा वासीय हिंदूंनी हर हर महादेव चा गजर करत त्याला जोरदार प्रतिसाद दिला..(Nitesh Rane Mumbra)
 
*एमआयएम च्या हिरव्या पिलावळीची वळवळ*
 
मंत्री नितेश राणे यांना मुंब्र्यात येण्याची बंदी घालावी अशी मागणी मुंब्रा मधील एमआयएम च्या हिरव्या पिलावळने केली होती..त्यासाठी एमआयएम चा नगरसेवक सैफ पठाण याने यासाठी चक्क पत्रही पोलिसांना पाठवत अशी मागणी केली..मात्र या हिरव्या पिलावळीला भीक न घालता मंत्री नितेश राणे यांनी मुंब्र्यात येऊन हिंदुत्वाचा आवाज बुलंद केल्याने मुंब्र्यातील हिंदूंमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले..(Nitesh Rane Mumbra)
 
 
 
 




संबंधित मजकूर